Type Here to Get Search Results !

Mahabaleshwar Times

Mahabaleshwar Times

महाबळेश्वरच्या 'हॉटेल फ्रेड्रिक' ' परिसरात 'शेकरू'चे दर्शन*

 *महाबळेश्वरच्या 'हॉटेल फ्रेड्रिक' ' परिसरात  'शेकरू'चे दर्शन* 


​महाबळेश्वर टाईम्स 

महाबळेश्वर : प्रतिनिधी 


 निसर्गाचे वरदान लाभलेल्या महाबळेश्वरमध्ये सध्या पर्यटकांना एक आगळीवेगळी मेजवानी मिळत आहे. येथील  'फ्रेड्रिक'  हॉटेलच्या परिसरात विस्तीर्ण आणि झाडाझुडुपांनी वेढलेल्या परिसरात महाराष्ट्राचा राज्यप्राणी असलेल्या शेकरू या प्राण्याचा मुक्त वावर पाहायला मिळत आहे.  

​ हॉटेलच्या आवारात असलेली जुनी आणि उंच झाडे शेकरू या प्राण्यासाठी सुरक्षित अधिवास ठरत आहेत. गेल्या काही दिवसांपासून या ठिकाणी शेकरूंचे दर्शन वारंवार होत आहे. हा प्राणी झाडांवर उड्या मारताना खूप चपळ असतो आणि एका झाडावरून दुसऱ्या झाडावर (सुमारे २० फुटांपर्यंत) उडी मारू शकतो.

याचे शरीर गडद तपकिरी, तांबूस किंवा अनेकदा पांढऱ्या (Albino) रंगाचे असते, जे महाबळेश्वरचे मुख्य आकर्षण आहे.

शेकरू दिवसा सक्रिय असतो (Diurnal) आणि उंच झाडांवर मऊ फांद्यांपासून घुमटाकार घरटे बांधतो.

अन्न: हे मुख्यत्वे शाकाहारी असून फळे, फुले, आणि झाडांची साल खातात.

​ शेंदरी-तपकिरी रंगाची लांबसडक शेपटी आणि चपळ हालचाली असलेल्या या प्राण्याला जवळून पाहणे हा  अविस्मरणीय अनुभव ठरत आहे.


​ अनेक पर्यटक आपले महागडे कॅमेरे आणि मोबाईल फोन वापरून या राजबिंड्या प्राण्याला टिपण्याचा प्रयत्न करत आहेत.

​ लहान मुलांसाठी हे 'लाईव्ह' वन्यजीव दर्शन आकर्षणाचे केंद्र बनले आहे.