Type Here to Get Search Results !

Mahabaleshwar Times

Mahabaleshwar Times

महाबळेश्वर स्थानिक टॅक्सी युनियन तर्फे इफ्तार पार्टीचे आयोजन : .

 महाबळेश्वर स्थानिक टॅक्सी युनियन तर्फे इफ्तार पार्टीचे आयोजन :                          .                            महाबळेश्वर टाईम्स           

महाबळेश्वर : प्रतिनिधी



रमजान च्या पवित्र महिन्या मध्ये मुस्लिम बांधव रोजे (उपवास) ठेवतात दरवर्षी प्रमाणे  यंदाही महाबळेश्वर टॅक्सी स्टॅण्ड येथे पवित्र रमजान महिन्याच्या निमित्ताने स्थानिक  टॅक्सी युनियनच्या वतीने इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते  या कार्यक्रमास  टॅक्सी व्यवसायिक व महाबळेश्वर शहरातील   मान्यवर, प्रतिष्ठित नागरिक तसेच हिंदू  मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. हिंदू मुस्लिम  बांधव एकोप्याने येथे टॅक्सी युनियनच्या माध्यमातून विविध कार्यक्रम आयोजीत करित असतात   दत्त जयंती उत्सव असो अथवा रमजान इफतार पार्टीचे आयोजन टॅक्सी युनियन मनोभावे करत असते

कार्यक्रमाचे नियोजन महाबळेश्वर टॅक्सी युनियनच्या पदाधिकाऱ्यांनी केले टॅक्सी युनियनचे अध्यक्ष इस्माईल (दादाभाई) मानकर, उपाध्यक्ष नंदकुमार वायदंडे, सेक्रेटरी इरफान कुरेशी अंकुश उफाळे , प्रविण शिंदे , इमाम नालबंद , नासीर पन्हाळकर अकिल पटेल , आझाद मुलाणी , रमेश अखाडे , राजेंद्र बावळेकर , मारुती डोईफोडे, जमीर सुतार , रमेश बावळेकर , सागर काळे


संचालक मंडळ तसेच सभासद यांनी  विशेष परिश्रम घेतले. 

या कार्यक्रमास महाबळेश्वर नगर परिषदेचे नगराध्यक्ष सुनील शिंदे, उपनगराध्यक्ष नासिर मुलाणी, नगरसेवक रोहित ढेबे, रवींद्र कुंभारदरे, राजू नालबंद, संतोष आखाडे, राहुल पिसाळ माजी नगराध्यक्ष डी एम बावळेकर, युसुफ शेख, महेश कोमटी अर्बन बँकेचे उपाध्यक्ष नदीम शारवान , संचालक शरद बावळेकर, जावेद वलगे, सतीश ओंबळे ,माजी नगरसेवक फकीर वलगे, शंकर ढेबे, अल्ताफ मानकर,  सलिम बागवान अक्षय वायदंडे इतर मान्यवर


महाबळेश्वर पोलीस निरीक्षक बापुसाहेब सांडभोर पत्रकार बांधव आदी मान्यवर उपस्थित होते.