Type Here to Get Search Results !

Mahabaleshwar Times

Mahabaleshwar Times

*रस्त्याच्या निकृष्ट कामाविरोधात महाबळेश्वर-पाचगणीत कडकडीत बंद; आंदोलनाच तीव्र करण्याचा इशारा*

 रस्त्याच्या निकृष्ट कामाविरोधात महाबळेश्वर-पाचगणीत कडकडीत बंद; आंदोलनाचा इशारा* 

​महाबळेश्वर टाईम्स 

महाबळेश्वर : प्रतिनिधी 


सुरूर ते महाबळेश्वर या मुख्य रस्त्याचे काम अत्यंत संथ गतीने आणि निकृष्ट दर्जाचे सुरू असल्याच्या निषेधार्थ, 'आम्ही महाबळेश्वरकर' च्या वतीने पुकारलेल्या बंदला महाबळेश्वर आणि पाचगणी शहरात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. दोन्ही शहरांतील बाजारपेठा आणि व्यवहार कडकडीत बंद राहिले. या आंदोलनामुळे प्रशासनाचे लक्ष वेधले गेले असून, आगामी काळात हे आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा स्थानिकांनी दिला आहे.



 *​ निकृष्ट दर्जाचे रस्त्यामुळे पर्यटक आणि स्थानिकांचे हाल पर्यटन व्यवसायावर परिणाम 


​सुरूर-महाबळेश्वर रस्त्याच्या रखडलेल्या कामामुळे वाई, पाचगणी आणि महाबळेश्वरमधील नागरिक तसेच पर्यटकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. निकृष्ट दर्जाच्या कामामुळे अपघातांचा धोका वाढला असून धुळीचाही त्रास होत आहे. या पार्श्वभूमीवर महाबळेश्वर येथे विविध राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी बाजारपेठेत फेरफटका मारून बंदची पाहणी केली. यावेळी माजी नगराध्यक्ष डी एम बावळेकर, राजेश कुंमारदरे, नगरसेवक रवींद्र कुंभारदरे, रमेश पल्लोड, विजय नायडू, महेश गुजर, राजेंद्र बावळेकर, राजेंद्र पवार, उषाताई ओंबळे, गोविंद कदम, शंकर ढेबे, इरफान कुरेशी, प्रमोद शेटे, अशोक शिंदे, नाना कदम, गिरीश नायडू,राजेंद्र पंडित, अनिल लोहार, रियाज भाई डांगे, बैतुलहा शेख, अंकित पल्लोड, तसेच महाबळेश्वर नागरिक व व्यापारी वर्ग उपस्थित होते.


माजी नगराध्यक्ष ​डी. एम. बावळेकर  म्हणाले, शासनाने आणि प्रशासनाने या रस्त्याच्या कामाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले आहे. रस्त्यासाठी निधीची तरतूद असूनही काम संथ गतीने सुरू आहे. प्रशासनाला जाग आली नाही, तर भविष्यात 'रस्ता रोको'सह विधानभवनावर धडक मोर्चा काढण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला. 


  महाबळेश्वरचे अर्थकारण पर्यटनावर अवलंबून असूनही व्यापाऱ्यांनी १००% बंद पाळून आपला निषेध नोंदवला आहे. केवळ महाबळेश्वर-पाचगणीच नव्हे, तर आता वाई शहरही दोन दिवसांनी बंद ठेवण्याचा निर्णय स्थानिक नागरिकांनी घेतला आहे. सुरुर महाबळेश्वर रस्त्याचे काम वेळेत पूर्ण झाल्यास न झाल्यास आंदोलनाची दिशा लवकरच ठरविण्यात येईल अशा तीव्र भावना   दि अर्बन बँकेचे संचालक ​राजेश कुंभारदरेयांनी व्यक्त केल्या. 


शिवसेनेचे शहर प्रमुख​ विजय नायडू  आपल्या भावना व्यक्त करताना म्हणाले सुरूर , महाबळेश्वर  , पाचगणी रस्ता लवकरात लवकर पूर्ण होणे गरजेचे आहे. जर प्रशासनाने या बंदची दखल घेतली नाही, तर संपूर्ण तालुक्यात यापेक्षाही तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशाराही त्यांनी दिला.

​या वेळी नगरसेवक रविंद्र कुंभारदरे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना या पुढे दखल न घेतल्यास आंदोलन तिव्र करण्यात येईल असा इशारा दिला.

​महाबळेश्वर आणि पाचगणीच्या यशस्वी बंदनंतर आता या आंदोलनाची धग वाई शहरात पोहोचणार आहे. येत्या काही दिवसांत वाई शहरही बंद ठेवण्यात येणार असून, निकृष्ट काम करणाऱ्या ठेकेदारावर आणि संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

                महाबळेश्वर  बाजार पेठ

                     वेण्णा लेक परिसर


      बातम्या व जाहिराती साठी 📰 संपर्क


          संपादक :- राहुल शेलार 


                📱 9765576377


     कार्यकारी संपादक  :- रियाज मुजावर 


                📱 9403546 485