Type Here to Get Search Results !

Mahabaleshwar Times

Mahabaleshwar Times

​महाबळेश्वर-पाचगणीच्या रखडलेल्या रस्त्यासाठी विधान परिषदेत आवाज; आमदार शशिकांत शिंदे यांचा सरकारला निर्वाणीचा इशारा*

 *​महाबळेश्वर-पाचगणीच्या रखडलेल्या रस्त्यासाठी विधान परिषदेत आवाज; आमदार शशिकांत शिंदे यांचा सरकारला निर्वाणीचा इशारा* 

महाबळेश्वर टाईम्स 

​महाबळेश्वर :  प्रतिनिधी


गेल्या दीड-दोन वर्षांपासून रखडलेल्या सुरत-पोलादपूर राज्य मार्गाच्या कामामुळे महाबळेश्वर आणि पाचगणी या जागतिक दर्जाच्या पर्यटन स्थळांची मोठी कोंडी झाली आहे. या संथ कामाच्या निषेधार्थ  काल ८ मार्च २०२६ रोजी स्थानिक नागरिकांनी पुकारलेल्या 'कडकडीत बंद'चे पडसाद थेट राज्याच्या विधान परिषदेत उमटले. आमदार शशिकांत शिंदे यांनी आक्रमक पवित्रा घेत शासनाचे लक्ष वेधले आणि तातडीने बैठक लावून प्रश्न मार्गी लावण्याची मागणी केली.


​आमदार शशिकांत शिंदे यांनी सभागृहात माहिती दिली की, महाबळेश्वर ते पाचगणी दरम्यान सुरू असलेले रस्ते काम अत्यंत कासवगतीने सुरू आहे. याचा थेट परिणाम स्थानिक पर्यटनावर होत असून व्यापाऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे.

 महाबळेश्वर आणि पाचगणीतील सर्व दुकाने, व्यावसायिक आस्थापने आणि वाहतूक पूर्णपणे बंद राहिली.

​लोकसहभाग: व्यापारी संघटना, नागरिक आणि विविध सामाजिक संघटनांनी या बंदमध्ये सक्रिय सहभाग नोंदवला.

 हे काम युद्धपातळीवर पूर्ण झाले नाही, तर यापेक्षाही तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दोन्ही शहरांतील जनतेने दिला आहे.

​मंत्री महोदयांकडे तातडीच्या बैठकीची मागणी

​सभागृहात बोलताना आमदार शिंदे म्हणाले की, "दीड वर्षांपासून हे काम रखडले आहे, प्रशासन नेमकं काय करतंय? पर्यटकांनी पाठ फिरवल्यामुळे या भागातील अर्थव्यवस्था धोक्यात आली आहे. मी याबाबत संबंधित मंत्र्यांशी चर्चा केली असून, पालकमंत्र्यांनी यात तातडीने हस्तक्षेप करावा."

​"रस्त्याचं काम अर्धवट असल्याने नागरिकांचा संयम सुटला आहे. मी सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले  महोदयांशी बोललो आहे, त्यांनी तातडीने बैठक लावावी आणि हे काम लवकरात लवकर कसं पूर्ण होईल याचा निर्णय घ्यावा. शासनाचे दुर्लक्ष आता सहन केले जाणार नाही.


बातम्या व जाहिराती साठी 📰 संपर्क


          संपादक :- राहुल शेलार 


              📱 9765576377


     कार्यकारी संपादक  :- रियाज मुजावर 


              📱 9403546 485