Type Here to Get Search Results !

Mahabaleshwar Times

Mahabaleshwar Times

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचा नगरपालिकेला इशारा; नगराध्यक्ष व मुख्याधिकाऱ्यांना दिले निवेदन..... ​महाबळेश्वर प्रतिनिधी:

 शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचा नगरपालिकेला इशारा; नगराध्यक्ष व मुख्याधिकाऱ्यांना दिले निवेदन..... 



महाबळेश्वर टाईम्स 

महाबळेश्वर : प्रतिनिधी

हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे चौकातील स्मारकाची गेल्या अनेक वर्षांपासून दुरवस्था झाली असून, या स्मारकाचे सुशोभीकरण करण्याबाबत नगरपरिषद प्रशासन सातत्याने टाळाटाळ करत आहे. या उदासीनतेचा निषेध करत, शहर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने नगराध्यक्ष सुनील शिंदे आणि मुख्याधिकारी योगेश पाटील यांना निवेदन देऊन लवकरात लवकर निर्णय घेण्याची मागणी करण्यात आली आहे. निर्णय न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशाराही यावेळी देण्यात आला. यावेळी उपनगराध्यक्ष नासिर मुलाणी, नगरसेवक अफजल भाई सुतार उपस्थित होते.

वारंवार पाठपुरावा करूनही प्रशासनाचे दुर्लक्ष

​शिवसेना शहर शाखेच्या वतीने गेल्या अनेक वर्षांपासून या स्मारकाच्या कामासाठी पाठपुरावा केला जात आहे. निवेदनात नमूद केल्यानुसार, पक्षाने यापूर्वी खालील तारखांना प्रशासनाला लेखी विनंती केली होती:

​०५ नोव्हेंबर २०१९

​११ जानेवारी २०१९

​११ जानेवारी २०२०

​१६ फेब्रुवारी २०२१

​इतक्या वेळा निवेदन देऊनही स्मारकाच्या सुशोभीकरणाबाबत कोणतीही ठोस पावले उचलली गेली नाहीत. यामुळे शिवसैनिकांमध्ये मोठ्या प्रमाणावर संताप व्यक्त केला जात आहे.

​"बाळासाहेब ठाकरे हे आमचे दैवत आहेत. त्यांच्या स्मारकाची होणारी दुरवस्था शिवसैनिक सहन करणार नाहीत. प्रशासनाने तातडीने सुशोभीकरणाचे काम हाती घ्यावे, अन्यथा आम्हाला रस्त्यावर उतरून आंदोलन करावे लागेल." असा इशाराही यावेळी दिला 


​निवेदन देताना शिवसेना जिल्हाप्रमुख यशवंत घाडगे, शहरप्रमुख राजाभाऊ गुजर, उपशहर प्रमुख बाळकृष्ण ढेबे, शंकर ढेबे, शाहनवाज खारखंडे, अल्लीभाई वारूणकर, तेजस बोधले यांसह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

              बातम्या व जाहिराती साठी 📰 संपर्क

                      संपादक :- राहुल शेलार 

                        📱 9765576377

            कार्यकारी संपादक :- रियाज मुजावर 

                        📱 9403546 485