Type Here to Get Search Results !

Mahabaleshwar Times

Mahabaleshwar Times

No title

 महाबळेश्वरमध्ये १९ एप्रिल रोजी घुमणार शिवरायांचा जयजयकार; शिवजयंती उत्सवाचे जय्यत नियोजन.....


महाबळेश्वर टाईम्स 

महाबळेश्वर : प्रतिनिधी 

​महाबळेश्वर येथील 'श्री शिवजयंती उत्सव समिती २०२६' च्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही अत्यंत उत्साहात आणि भव्य स्वरूपात शिवजयंती व शिवोत्सव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. चैत्र वैशाख शके १९४८, रविवार दि. १९ एप्रिल २०२६ रोजी हा मुख्य सोहळा पार पडणार असून, त्यानिमित्त विविध सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे.

​उत्सवाचे औचित्य साधून शनिवार, दि. १८ एप्रिल रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. 


​रांगोळी स्पर्धा: दुपारी २ ते ४:३० या वेळेत शेठ गंगाधर माखरिया हायस्कूल येथे ही स्पर्धा होईल. पहिल्या तीन क्रमांकांना आकर्षक बक्षिसे व प्रशस्तीपत्रक देण्यात येणार आहे. (नोंदणीसाठी संपर्क: ९३७२२५५२१९)


​रक्तदान व आरोग्य शिबीर: सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत पेटीट लायब्ररी हॉल येथे भव्य रक्तदान शिबीर व मोफत आरोग्य शिबीर आयोजित केले आहे. प्रत्येक रक्तदात्यास समितीच्या वतीने प्रोत्साहनपर भेटवस्तू देण्यात येणार आहे.


​रविवार रोजी सकाळी ९:३० वाजल्यापासून कार्यक्रमांना सुरुवात होईल:

​सकाळी ९:३०किल्ले रायरेश्वर येथून आणलेल्या शिवज्योतीचे सुभाष चौक येथे आगमन.

​सकाळी १०:३० छत्रपती शिवाजी महाराज स्मारक चौक येथे रुद्र अभिषेक.

​सकाळी 11 सुभाष चौक व स्मारक चौक येथे ध्वजारोहण व ध्वजपूजन.

​सकाळी ११:३० श्रीराम मंदिर येथे शिवरायांचा पाळणा सोहळा.

​दुपारी ४ कोळी आळी येथून छत्रपती शिवाजी महाराजांची भव्य मिरवणूक काढण्यात येईल.

​रात्री १० शिवरायांच्या महाआरतीने सोहळ्याची सांगता होईल.


​महाबळेश्वरच्या सर्व नगरवासियांनी आणि शिवभक्तांनी या सर्व कार्यक्रमांना मोठ्या संख्येने उपस्थित राहून सोहळ्याची शोभा वाढवावी, असे आवाहन उत्सव समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

या महोत्सवाच्या यशस्वीतेसाठी उत्सव समितीचे 

​अध्यक्ष सुशांत अनिल पार्टे,

​उपाध्यक्ष अक्षय विजय चव्हाण

​खजिनदार, शुभम नरेंद्र कुंभारवरे,

​सचिव राहुल सुभाष शेलार व

​कार्याध्यक्ष आशिष चोरगे​ हे पदाधिकारी व शिवभक्त परिश्रम घेत आहे.



                       बातम्या व जाहिराती साठी 📰 संपर्क

                              संपादक :- राहुल शेलार 

                             📱 9765576377

               कार्यकारी संपादक  :- रियाज मुजावर 

                           📱 9403546 485