Type Here to Get Search Results !

Mahabaleshwar Times

Mahabaleshwar Times

महाबळेश्वरमध्ये शिवजयंतीचा अभूतपूर्व उत्साह; अघोरी नृत्य आणि जिवंत सादरीकरणाने वेधले सर्वांचे लक्ष

 महाबळेश्वरमध्ये शिवजयंतीचा अभूतपूर्व उत्साह; अघोरी नृत्य आणि जिवंत सादरीकरणाने वेधले सर्वांचे लक्ष


महाबळेश्वर टाईम्स 

महाबळेश्वर : प्रतिनिधी

​महाबळेश्वर येथे शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती अत्यंत उत्साहात आणि पारंपारिक पद्धतीने साजरी करण्यात आली. दिवसभर विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांनी अवघे महाबळेश्वर शहर 'शिवमय' झाले होते.

​उत्सवाची सुरुवात सकाळी शिवाजी चौक येथे रुद्राभिषेकाने झाली. त्यानंतर शिवाजी चौक आणि सुभाष चौक येथे ध्वजवंदन करण्यात आले. शिवजयंती उत्सव समितीचे अध्यक्ष सुशांत पारठे व उपाध्यक्ष अक्षय चव्हाण यांनी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला.

​याप्रसंगी महाबळेश्वर नगरपालिकेचे नगराध्यक्ष सुनील शिंदे, उपनगराध्यक्ष नासिर मुलाणी आणि मुख्याधिकारी योगेश पाटील यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून नारळ फोडण्यात आला. समितीच्या वतीने नेताजी सुभाषचंद्र बोस, यशवंतराव चव्हाण आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासही अभिवादन करण्यात आले. तसेच शहरातील विविध भागांतील छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करण्यात आले. श्रीराम मंदिर येथे शिवजन्मोत्सवाचा पाळणा कार्यक्रम उत्साहात पार पडला.

 


शिवज्योत पदयात्रा आणि भगवे वातावरण

​मेटगुताड, अवकाळी, मांघर, माचुतर, मेटतळे, गुरेघर, चिखली येथील शिवभक्तांनी शिवज्योत आणली होती. ही शिवज्योत पदयात्रा मुख्य बाजारपेठेतून काढण्यात आली. शहरात ठिकठिकाणी लावलेले भगवे झेंडे, भव्य स्वागत कमानी आणि शिवपराक्रम सांगणारे पोवाडे यामुळे वातावरणात वेगळाच चैतन्य संचारला होता.


मिरवणुकीतील विशेष आकर्षणे

​सायंकाळी कोळी आळी ते शिवाजी चौक दरम्यान भव्य दिव्य मिरवणूक काढण्यात आली. 

​ अघोरी रुद्र अवतार शो: अंगावर रोमांच उभा करणारी भस्म आरती आणि अघोरी नृत्याचा थरार.

​ भगवान शंकर-पार्वती विवाह सोहळा.

​भव्य महानाट्य: हिरण्यकश्यपू वध आणि भगवान नरसिंहाचा अवतार याचे जिवंत सादरीकरण.

​प्रभू श्रीराम यांचा जिवंत वेष मिरवणुकीचे मुख्य आकर्षण ठरले.

​या सोहळ्याला समितीचे सचिव राहुल शेलार, खजिनदार शुभम कुंभारदरे, कार्याध्यक्ष आशिष चोरगे, नगरसेवक किसनशेट शिंदे, संतोष आबा शिंदे, रवींद्र कुंभारदरे, अफजल भाई सुतार, संतोष आखाडे, राहुल पिसाळ,माजी नगराध्यक्ष डी. एम. बावळेकर, माजी नगरसेविका विमलताई ओंबळे, संचालक सतीश ओंबळे, विजय नायडू, विशाल तोष्णीवाल,अनंत भिसे, नाना कदम, अक्षय वायदंडे, दानिश मुलाणी यांच्यासह अनेक आजी-माजी नगरसेवक, पदाधिकारी आणि शेकडो शिवभक्त उपस्थित होते.

​मिरवणूक यशस्वी करण्यासाठी संतोष साळुंखे, आकाश साळुंखे, सचिन काळे, गणेश भोसले, गोविंद वाघ, स्वरूप देवकर, श्रीकांत जांभळे, अनिरुद्ध धोत्रे, स्वप्नील बकरे यांच्यासह अनेक शिवभक्तांनी परिश्रम घेतले. रात्री छत्रपती शिवाजी चौकात महाआरती करून या दिमाखदार सोहळ्याची सांगता करण्यात आली.

                     

                 बातम्या व जाहिराती साठी 📰 संपर्क

                     संपादक :- राहुल शेलार 

                       📱 9765576377

                कार्यकारी संपादक :- रियाज मुजावर 

                       📱 9403546 485