सातारा जिल्हा पोलीस दलात खांदेपालट: निखील पिंगळे नवे पोलीस अधीक्षक, तुषार दोशी यांची सांगलीला बदली
महाबळेश्वर टाईम्स
महाबळेश्वर : प्रतिनिधी
राज्य गृहविभागाने पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश नुकतेच निर्गमित केले असून, सातारा जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षक पदाची जबाबदारी आता निखील पिंगळे यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. दरम्यान, साताऱ्याचे मावळते पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांची बदली सांगलीच्या पोलीस अधीक्षक पदी करण्यात आली आहे.
साताऱ्याचे नूतन पोलीस अधीक्षक म्हणून नियुक्ती झालेले निखील पिंगळे हे अनुभवी अधिकारी म्हणून ओळखले जातात. सातारा जिल्ह्याची भौगोलिक परिस्थिती आणि संवेदनशील मुद्दे लक्षात घेता, त्यांच्यासमोर आगामी काळात विविध आव्हाने असणार आहेत. सातारा जिल्ह्याचा कारभार हाती घेतल्यानंतर ते कोणत्या प्राथमिकता ठरवतात, याकडे आता संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
जिल्ह्यातील राजकीय घडामोडी, वाहतुकीचे प्रश्न आणि पर्यटनाच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या या जिल्ह्यात पिंगळे यांचा कार्यकाळ कसा राहतो, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. लवकरच ते आपल्या पदाचा पदभार स्वीकारतील अशी शक्यता आहे.
बातम्या व जाहिराती साठी 📰 संपर्क
संपादक :- राहुल शेलार
📱 9765576377
कार्यकारी संपादक :- रियाज मुजावर
📱 9403546 485


Social Plugin