Type Here to Get Search Results !

Mahabaleshwar Times

Mahabaleshwar Times

महाबळेश्वरमध्ये ६७ वा महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा; विविध ठिकाणी मान्यवरांच्या हस्ते राष्ट्रध्वजवंदन*

 महाबळेश्वरमध्ये ६७ वा महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा; विविध ठिकाणी मान्यवरांच्या हस्ते राष्ट्रध्वजवंदन

महाबळेश्वर टाईम्स

​महाबळेश्वर प्रतिनिधी- 

संपूर्ण राज्यासह महाबळेश्वरमध्येही ६७ वा महाराष्ट्र दिन मोठ्या उत्साहात आणि चैतन्यमय वातावरणात साजरा करण्यात आला. महाबळेश्वर शहरातील शासकीय कार्यालये, निमशासकीय संस्था  येथे मान्यवरांच्या हस्ते राष्ट्रध्वजवंदन करून महाराष्ट्र दिनाचा सोहळा उत्साहात पार पडला.

मुख्य शासकीय राष्ट्रध्वजवंदन महाबळेश्वर तहसील कार्यालयात तहसीलदार सचिन मस्के यांच्या हस्ते करण्यात आले.

​   
महाबळेश्वर नगरपालिकेच्या प्रांगणात नगराध्यक्ष सुनील शिंदे यांच्या हस्ते राष्ट्रध्वजवंदन करण्यात आले.

.     
सुभाषचंद्र बोस  चौकात उपनगराध्यक्ष नासिरभाई मुलाणी यांच्या हस्ते राष्ट्रध्वजवंदन संपन्न झाले.
बँकेचे चेअरमन सी. डी. बावळेकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

​उपस्थित मान्यवर: ​या सोहळ्याप्रसंगी मुख्याधिकारी योगेश पाटील, माजी नगराध्यक्ष डी. एम. बावळेकर, गटनेते ॲड. संजय जंगम, नगरसेवक अफजल सुतार, आबा शिंदे, रोहित ढेबे, रवींद्र कुंभारदरे, संतोष अखाडे, राजू नालबंद, किसन शेठ शिंदे आणि मिलिंद ढेबे उपस्थित होते.


​महिला प्रतिनिधी  ज्येष्ठ नगरसेविका विमल पारठे, संगिता वाडकर, विद्या बावळेकर, स्मिता पाटील, रेश्मा ढेबे यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच युसूफ शेख, प्रतिष्ठित नागरिक, शालेय  विद्यार्थी, शिक्षक, नगरपालिका कर्मचारी आणि अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी अर्बन बँकेचे व्हा .चेअरमन नदीम शाखान, संचालक राजेश कुंभारदरे, समीर सुतार, शरद बावळेकर, जावेद वलगे, संपत जाधव, प्रशात  कात्रट संचालिका उषा ओंबळे, , मनिषा पारठे ,मुख्य व्यवस्थापक फकीरभाई वलगे, कर्मचारी वर्ग यांच्यासह बँकेचे खातेदार व सभासद उपस्थित होते.




              बातम्या व जाहिराती साठी 📰 संपर्क

                 संपादक :- राहुल शेलार 

                    📱 9765576377

           कार्यकारी संपादक  :- रियाज मुजावर 

                   📱 9403546 485