महाबळेश्वर इनरव्हील क्लब च्या वतीने अंगणवाडीस साहित्य वाटप
अध्यक्षा वर्षा पार्टे यांच्यासह सदस्यांच्या उपस्थितीत
महाराष्ट्र न्यूज : राहुल शेलार
महाबळेश्वर(सातारा)
महाबळेश्वर मध्ये सेवाकार्यात सातत्याने अग्रेसर असलेल्या इनरव्हील क्लब ऑफ महाबळेश्वर यांच्यावतीने अध्यक्षा वर्षा संतोष पार्टे यांच्या सहकार्याने एकात्मिक बाल विकास नागरी प्रकल्प अंतर्गत कार्यरत असलेल्या सातारा येथील अंगणवाडीला येथील हॉटेल अशोका सभागृहात आयोजित कार्यक्रमात क्लबच्यावतीने बालशिक्षणाचा आवश्यक ३२ इंचाचा स्मार्ट टीव्ही व मुलांना बसण्यासाठी बसखरे अंगणवाडीस भेट म्हणून देण्यात आले.
अध्यक्षा वर्षा पार्टे यांनी यावेळी बोलताना,इनरव्हील क्लब ही जगातील सर्वात मोठी स्वयंसेवी संस्थां असून महिला सक्षमीकरण व समाज कार्यात नेहमीच अग्रेसर राहिली आहे या संस्थेचे आम्ही पदाधिकारी आल्याचा आम्हाला अभिमान आहे आमच्या क्लब च्यावतीने माध्यमातून अनेकविध सामाजिक शैक्षणिक उपक्रम आम्ही राबवीत असतो आश्याचप्रकरे सातारा येथील अंगणवाडीच्या मागणीची दखल घेत बाल शिक्षणासाठी आवश्यक असलेल्या ३२ इंचाचा स्मार्ट टीव्ही व बालचमूनं बसण्यासाठी बस्करे देण्याचा निर्णय आमच्या बैठकीत घेण्यात आला होता व ही मदत या अंगणवडीस देण्यात आली असल्याचे सांगितले अंगणवाडी सेविका रेश्मा विष्णू तपासे यांनी अंगणवाडीस दिलेल्या मदती बद्दल इनरव्हील क्लब व अध्यक्षा वर्षा पार्टे यांचे आभार मानले यावेळी सचिव सपना अरोरा,रमा पल्लोड,ऍड राधा मुक्कावर,मुक्ता कोमटी,अश्विनी कोमटी,वर्षा कोमटी,नेहा साळवी,तृप्ती तोष्णीवाल आदींसह क्लब सदस्य उपस्थित होत्या.
बातम्या व जाहिराती साठी 📰 संपर्क
संपादक :- राहुल शेलार
📱 9765576377
कार्यकारी संपादक :- रियाज मुजावर
📱 9403546 485


Social Plugin