Type Here to Get Search Results !

Mahabaleshwar Times

Mahabaleshwar Times

नगराध्यक्ष सुनील शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त ३५० नागरिकांची नेत्रतपासणी; १८० जणांना मोफत चष्म्यांचे वाटप.....

 नगराध्यक्ष सुनील शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त ३५० नागरिकांची नेत्रतपासणी ; १८० जणांना मोफत चष्म्यांचे वाटप.....



महाबळेश्वर टाईम्स

महाबळेश्वर : प्रतिनिधी 

महाबळेश्वरचे लोकप्रिय लोकनियुक्त नगराध्यक्ष सुनील शिंदे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून शहरात सामाजिक बांधिलकी जपत 'मोफत डोळे तपासणी व चष्मा वाटप' शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचे उद्घाटन नगराध्यक्ष  सुनील शिंदे यांच्या हस्ते उत्साहात संपन्न झाले.

केवळ हार-तुरे आणि औपचारिकता न पाळता जनतेच्या आरोग्यासाठी उपयुक्त उपक्रम राबवून नगराध्यक्षांनी आपला वाढदिवस साजरा केला. या शिबिरात महाबळेश्वरमधील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. डॉ. सचिन खरात यांनी या शिबिरात सुमारे ३५० नागरिकांची सखोल नेत्रतपासणी केली. विशेष म्हणजे, तपासणीनंतर गरजू आढळलेल्या १८० नागरिकांना मोफत चष्म्यांचे वाटप   मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. तसेच मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया २२ रुग्णांवर करण्यात येणार आहे.

या  प्रसंगी नगराध्यक्षांसोबत,नगरसेवक: संतोष (आबा) शिंदे, नगरसेविका : विद्या बावळेकर, प्रवीण रिंगे, बापू बिरामणे,सागर सोनावणे यांच्यासह आरोग्य विभागाचे प्रमोद कुंभार, संतोष दड, बबन जाधव, सचिन दीक्षित आदी उपस्थित होते.


केवळ औपचारिकता न पाळता जनतेच्या आरोग्यासाठी उपयुक्त उपक्रम राबवून नगराध्यक्षांनी आपला वाढदिवस साजरा केला. या शिबिरात महाबळेश्वरमधील अनेक नागरिकांनी आपली नेत्रतपासणी करून घेतली. गरजू रुग्णांना तज्ज्ञ डॉक्टरांकडून पुढील उपचारांसाठी मार्गदर्शनही करण्यात आले.

 


यावेळी बोलताना नगराध्यक्ष सुनील शिंदे यांनी व्यक्त केले की, "शहरातील नागरिकांचे आरोग्य सुदृढ राहावे, हाच आमचा मुख्य उद्देश आहे. वाढदिवसाच्या निमित्ताने अशा आरोग्यदायी उपक्रमातून जनतेची सेवा करण्याची संधी मिळाली याचा आनंद वाटत असल्याच्या भावना त्यांनी व्यक्त केल्या.

या आरोग्य शिबिरासाठी ओंकार पवार, स्वप्नील शिंदे,किरण दळवी, विजय शिंदे,रवीकिरण चोरगे,सागर शिंदे, स्वप्निल कदम, अनिकेत शिंदे यांनी परिश्रम घेतले.



       बातम्या व जाहिराती साठी 📰 संपर्क

               संपादक :- राहुल शेलार 

                  📱 9765576377

         कार्यकारी संपादक :- रियाज मुजावर 

                  📱 9403546 485