Type Here to Get Search Results !

Mahabaleshwar Times

Mahabaleshwar Times

महाबळेश्वरमध्ये टॅक्सी चालकाचा प्रामाणिकपणा; पर्यटकाचा विसरलेला मोबाईल केला परत

 महाबळेश्वरमध्ये टॅक्सी चालकाचा प्रामाणिकपणा; पर्यटकाचा विसरलेला मोबाईल केला परत.....


महाबळेश्वर टाईम्स 
महाबळेश्वर (प्रतिनिधी) 

महाबळेश्वर येथे पर्यटनासाठी आलेल्या एका पर्यटकाचा लाखो रुपयांचा मोबाईल टॅक्सीमध्येच विसरला होता. मात्र, टॅक्सी चालकाने दाखवलेल्या प्रामाणिकतेमुळे हा मोबाईल संबंधित पर्यटकाला सुखरूप परत मिळाला आहे. या प्रामाणिक टॅक्सी चालकाचे नाव मतिन महापुळे  असे असून, त्यांच्या या प्रमाणिक कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे. 

एका पर्यटकाने महाबळेश्वर येथील प्रेक्षणीय स्थळे पाहण्यासाठी मतिन महापुळे  यांची टॅक्सी भाड्याने घेतली होती. दिवसभर फिरून झाल्यानंतर आणि पर्यटन संपवून हा पर्यटक आपल्या घरी सुखरूप पोहोचला. मात्र, घरी गेल्यानंतर आपल्याकडे मोबाईल नसल्याचे त्याच्या लक्षात आले. त्याने सर्वत्र शोध घेतला, पण मोबाईल सापडला नाही.

​दरम्यान, पर्यटक घरी गेल्यानंतर     मतिन महापुळे यांना त्यांच्या गाडीची आवराआवर करताना गाडीत एक मोबाईल सापडला. तो मोबाईल त्याच पर्यटकाचा असल्याचे मतिन यांच्या लक्षात आले. त्यांनी कोणताही विलंब न लावता तातडीने त्या पर्यटकाशी संपर्क साधला आणि तो मोबाईल सुरक्षित असल्याचे सांगितले. त्यानंतर मतिन यांनी तो मोबाईल अत्यंत प्रामाणिकपणे त्या पर्यटकाकडे सुपूर्द केला.

टॅक्सी संघटनेच्या वतीने मतीन महापुळे यांना धन्यवाद देण्यात आले 


          बातम्या व जाहिराती साठी 📰 संपर्क

                 संपादक :- राहुल शेलार 

                📱 9765576377

         कार्यकारी संपादक :- रियाज मुजावर 

                📱 9403546 485