महाबळेश्वर अर्बन बँकेत लोकनियुक्त नगराध्यक्ष सुनील शेठ शिंदे यांच्याकडून वाढदिवसानिमित्त १ लाखांचे शेअर्स सुपूर्द
नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांकडूनही २.५ लाखांचे भागभांडवल; बँकेच्या प्रगतीला हातभार
महाबळेश्वर टाईम्स
महाबळेश्वर : प्रतिनिधी
महाबळेश्वर नगरपालिकेचे लोकनियुक्त नगराध्यक्ष सुनील शेठ शिंदे यांनी आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधून सामाजिक व आर्थिक बांधिलकी जपली आहे. महाबळेश्वरची आर्थिक वाहिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दि महाबळेश्वर अर्बन को-ऑप बँक, महाबळेश्वर' मध्ये नगराध्यक्ष सुनील शिंदे यांनी १ लाख रुपयांचे शेअर्स (भागभांडवल) जमा केले.
त्यांच्या या स्तुत्य उपक्रमाचे अनुकरण करत पालिकेतील इतर नगरसेवक व पदाधिकाऱ्यांनीही बँकेत मोठी गुंतवणूक केली आहे. यामध्ये
अफजल भाई सुतार (नगरसेवक व बांधकाम सभापती) – रु ५०,०००
रोहित भाऊ ढेबे (नगरसेवक व शिक्षण सभापती) – रू ५०,०००
संतोष आबा शिंदे (नगरसेवक) – रू ५०,०००
अशा प्रकारे एकूण २.५ लाख रुपयांच्या शेअर्सची रक्कम बँकेचे चेअरमन शसी. डी. बावळेकर यांच्याकडे सन्मानपूर्वक सुपूर्द करण्यात आली. वाढदिवसाचा बडेजाव टाळून स्थानिक बँकेला बळकटी देण्याच्या या निर्णयाचे शहरात कौतुक होत आहे.
या छोटेखानी आणि महत्त्वपूर्ण कार्यक्रमाप्रसंगी माजी चेअरमन व विद्यमान संचालक राजेश कुंभारदरे, माजी नगराध्यक्ष युसुफभाई शेख, संचालक समीर सुतार, सतीश ओंबळे, प्रशांत कात्रट यांच्यासह शहरातील पत्रकार बंधू आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरवात संचालक समीर सुतार यांनी प्रास्ताविकाने केली. त्यांनी नगराध्यक्षांच्या या उपक्रमाचे महत्त्व पटवून दिले. यानंतर बँकेचे चेअरमन सी. डी. बावळेकर यांनी सर्व मान्यवरांचे स्वागत केले व आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की, लोकप्रतिनिधींनी स्थानिक बँकेवर दाखवलेला हा विश्वास बँकेच्या पुढील प्रगतीसाठी अत्यंत प्रेरक ठरेल.
कार्यक्रमाच्या शेवटी संचालक बंडू दादा कुंभारदरे यांनी उपस्थितांचे आणि बँकेला सहकार्य करणाऱ्या सर्व लोकप्रतिनिधींचे मनापासून आभार मानले.
बातम्या व जाहिराती साठी 📰 संपर्क
संपादक :- राहुल शेलार
📱 9765576377
कार्यकारी संपादक :- रियाज मुजावर
📱 9403546 485


Social Plugin