Type Here to Get Search Results !

Mahabaleshwar Times

Mahabaleshwar Times

महाबळेश्वरच्या बेल एअर संचालित ग्रामीण रुग्णालयाची टास्क फोर्स प्रमुख डॉ. दीपक सावंत यांच्याकडून अचानक पाहणी

 महाबळेश्वरच्या बेल एअर संचालित ग्रामीण रुग्णालयाची टास्क फोर्स प्रमुख डॉ. दीपक सावंत यांच्याकडून अचानक पाहणी

नव्याने उभारल्या जाणाऱ्या केंद्रासाठी स्वतःकडून एक 'डायलेसिस युनिट' देणार असल्याची घोषणा



महाबळेश्वर टाईम्स 

महाबळेश्वर : प्रतिनिधी


महाबळेश्वरच्या बेल एअर संस्थेद्वारे संचालित ग्रामीण रुग्णालयाला माजी आरोग्यमंत्री तथा 'कुपोषण निर्मूलन व संसर्गजन्य आजार नियंत्रण' कृती दलाचे  प्रमुख डॉ. दीपक सावंत यांनी मंगळवारी सकाळी अचानक भेट दिली. या भेटीदरम्यान त्यांनी रुग्णालयातील विविध विभागांची पाहणी करत रुग्णसेवेचा सविस्तर आढावा घेतला. तसेच रुग्णालयाच्या वतीने नव्याने उभारण्यात येणाऱ्या डायलेसिस केंद्रासाठी स्वतःच्या वतीने एक 'डायलेसिस युनिट' देणार असल्याचे त्यांनी यावेळी जाहीर केले.

या पाहणी दौऱ्याप्रसंगी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. पंडित देशमुख, कार्यालयीन अधीक्षक बाजीराव आंब्राळे, शिवसेना शहरप्रमुख विजय नायडू, प्रवीण नाना कदम, सचिन गुजर, महेश शर्मा आदी पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते.


महाबळेश्वर तालुका हा दुर्गम डोंगरी भाग म्हणून ओळखला जातो. येथील 'मोरारजी गोकुळदास ग्रामीण रुग्णालय' हे गेली अनेक वर्षे शासकीय दुर्लक्षामुळे अत्यंत दयनीय अवस्थेत होते. सक्षम वैद्यकीय यंत्रणा आणि तातडीच्या सेवा उपलब्ध नसल्याने अनेक स्थानिक नागरिक व पर्यटकांना आपले प्राण गमवावे लागले होते. अनेक लोकप्रतिनिधी आणि मंत्र्यांच्या दौऱ्यानंतरही या रुग्णालयाची व्यथा सुटली नव्हती.

जुलै २०१७ मध्ये मुसळधार पावसात तत्कालीन आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी येथे अचानक भेट दिली होती. तेव्हा रुग्णालयात एकही डॉक्टर हजर नव्हता, तर उपस्थित शिपायाने आरोग्यमंत्र्यांनाच तुम्ही कोण असा उलट प्रश्न केला होता. या दुरवस्थेनंतर स्थानिक शिवसैनिकांनी हे रुग्णालय खाजगी संस्थेकडे वर्ग करण्याची मागणी केली होती. त्यानंतर, रेडक्रॉस सोसायटीचे पदसिद्ध उपाध्यक्ष या नात्याने डॉ. सावंत यांनी हे रुग्णालय प्रायोगिक तत्त्वावर पाचगणीच्या 'बेल एअर हॉस्पिटल'कडे हस्तांतरित करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला.

मी आरोग्यमंत्री असताना हे रुग्णालय बेल एअर संस्थेकडे देण्याचा जो निर्णय घेतला, त्यामुळे आज या रुग्णालयाचा आणि परिसराचा पूर्णपणे कायापालट झाला आहे," अशा शब्दांत डॉ. सावंत यांनी समाधान व्यक्त केले. जेष्ठ समाजसेवक जयसिंग मारीवाला, उद्योजक आणि हॉटेल व्यावसायिकांच्या सहकार्याने निधी उभारून ब्रिटिशकालीन इमारतीचे नूतनीकरण करण्यात आले आहे. सध्या या रुग्णालयाचे श्रेणीवर्धन करण्याच्या हालचाली राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांच्या माध्यमातून सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.

डॉ. दीपक सावंत यांनी रुग्णालयातील अतिदक्षता विभाग (ICU), अपघात व बाह्य रुग्ण विभाग (OPD), एक्स-रे 

रुग्णालयाच्या आणखी काही अडीअडचणी असल्यास थेट माझ्याशी संपर्क साधा, त्या सोडवण्यासाठी मी कटिबद्ध आहे. या संदर्भात लवकरच जिल्हा शल्यचिकित्सकांसोबत बैठक घेण्यात येईल. दुर्गम भागातील नागरिक आणि पर्यटकांना अशीच दर्जेदार सेवा देण्यासाठी बेल एअर व्यवस्थापनाने सदैव आग्रही राहावे, असेही आवाहन  डॉ. दीपक सावंत  यांनी केले.



         बातम्या व जाहिराती साठी 📰 संपर्क

                   संपादक :- राहुल शेलार 

                     📱 9765576377

            कार्यकारी संपादक  :- रियाज मुजावर 

                     📱 9403546 485