महाबळेश्वरचे लोकनियुक्त नगराध्यक्ष सुनील शिंदे ; यांना नितीन बापू साळुंखे व सागर सोनावणे मित्र परिवारा कडून शुभेच्छा
महाबळेश्वर टाईम्स
महाबळेश्वर: महाबळेश्वर गिरीस्थान नगरपरिषदेचे लोकप्रिय आणि लोकनियुक्त नगराध्यक्ष सुनील शिंदे यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या विशेष दिनाचे औचित्य साधून नितीन बापू साळुंखे व सागर सोनावणे मित्र परिवाराच्या वतीने महाबळेश्वर नगरीचे नगराध्यक्षांना प्रत्यक्ष भेटून व पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या.
यावेळी बोलताना "सुनील शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महाबळेश्वर शहराचा चेहरामोहरा बदलत आहे. त्यांच्या पुढील वाटचालीस मित्र परिवारा तर्फे मनापासून शुभेच्छा दिल्या "नगराध्यक्षांचे कार्य सर्वांसाठी प्रेरणादायी असून त्यांना उदंड आयुष्य लाभो," अशी भावना व्यक्त केली.
या वेळी अर्बन बँक संचालक अनिल भाऊ साळुंखे, उमेश काळे, मिथलेश कानडे, संजय साळुंखे, तरीक काळे, विक्रम सोनावणे, दिपक साळुंखे इत्यादी मान्यवर उपस्थित होते


Social Plugin