Type Here to Get Search Results !

Mahabaleshwar Times

Mahabaleshwar Times

महाबळेश्वर नगरपरिषद आणि गर्ल्स युथ क्लबतर्फे भव्य वृक्षारोपण अभियान संपन्न*

 महाबळेश्वर नगरपरिषद आणि गर्ल्स युथ क्लबतर्फे भव्य वृक्षारोपण अभियान संपन्न

महाबळेश्वर टाईम्स


​महाबळेश्वर:पर्यावरण संवर्धन आणि शहराच्या हरित वैभवात भर घालण्याच्या उद्देशाने, गर्ल्स युथ क्लब महाबळेश्वर आणि महाबळेश्वर नगरपरिषदेच्या उद्यान विभागाच्या संयुक्त विद्यमाने महाबळेश्वर शहरातील   वैकुंठधाम हिंदू स्मशानभूमी येथे भव्य वृक्षारोपण अभियानाचे आयोजन करण्यात आले होते. या मोहिमेला स्थानिक लोकप्रतिनिधी, प्रशासकीय अधिकारी आणि सामाजिक संस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

​याप्रसंगी महाबळेश्वरचे नगराध्यक्ष सुनील शिंदे, उपनगराध्यक्ष नासिर मुलाणी यांच्यासह नगरसेवक अफजल सुतार, रवींद्र कुंभारदरे, संजय जंगम, राजूभाई नालबंद, नगरसेविका स्मिता पाटील आणि रोहित ढेबे प्रामुख्याने उपस्थित होते. 

या वृक्षारोपण प्रसंगी लोकप्रतिनिधींनी स्वतः खड्डे खणून व रोपे लावून या मोहिमेचा शुभारंभ केला.

​प्रशासकीय व सामाजिक संस्थांचा सक्रिय सहभाग

या अभियानात वनविभागाचे वनपाल सुनील लांडगे, मुख्य लिपिक बबन जाधव, वृक्ष अधिकारी कल्याण हिवरे आणि विशाल तोष्णीवाल यांनी तांत्रिक व प्रशासकीय मदत करत वृक्षारोपणाचे महत्त्व विशद केले. तसेच रोटरी क्लबचे अध्यक्ष विजय काळे आणि सतिश लोखंडे यांनीही उपस्थित राहून या पर्यावरणपूरक उपक्रमाला पाठबळ दिले.


या मोहिमेचे मुख्य आकर्षण ठरलेल्या गर्ल्स युथ क्लब महाबळेश्वर'च्या वतीने अध्यक्षा तृप्ती निलाखे, उपाध्यक्षा सुप्रिया शेडगे, सेक्रेटरी दिपाली खुरासणे, खजिनदार वैशाली चौरसिया आणि छाया कुंभारदरे यांच्यासह क्लबच्या सदस्या प्रिती भांगडीया ,  सुप्रिया धोत्रे,वर्षा शेटे , सोनाली उगले , विशाखा परदेशी , उल्का शिपटे  दिपाली उगले, रेश्मा शिपटे, रूपाली उगले ,वैशाली उगले, रूपाली परदेशी इत्यादी मान्यवरांनी वृक्षारोपणात हिररीने भाग घेतला. लावलेल्या झाडांचे केवळ रोपण न करता त्यांचे संवर्धन करण्याची जबाबदारीही उपस्थित सर्वांनी घेतली.

​"महाबळेश्वरचे नैसर्गिक सौंदर्य टिकवून ठेवण्यासाठी जास्तीत जास्त झाडे लावणे आणि ती जगवणे ही काळाची गरज आहे, असा सूर याप्रसंगी बोलताना सर्व मान्यवरांनी व्यक्त केला. या यशस्वी उपक्रमाबद्दल सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.