Type Here to Get Search Results !

Mahabaleshwar Times

Mahabaleshwar Times

मश्वर येथे इनरव्हील क्लबच्या वतीने गरजू जेष्ठ महिलांसाठी ब्लँकेट वाटप

 मश्वर येथे इनरव्हील क्लबच्या वतीने गरजू जेष्ठ महिलांसाठी ब्लँकेट वाटप 


अध्यक्षा वर्षा संतोष पार्टे यांच्यासह सदस्यांच्या उपस्थितीत 

महाबळेश्वर टाईम्स 

    महाबळेश्वर दि ०६-०५ महाबळेश्वर येथे इनर व्हील क्लबच्या वतीने गरजू जेष्ठ महिलांना ब्लँकेट वाटपचा कार्यक्रम येथील हॉटेल अशोका इन येथे क्लब अध्यक्षा वर्षा पार्टे यांच्या नेतृत्वात आयोजित करण्यात आला होता या उपक्रमांतर्गत घरकाम करणाऱ्या जेष्ठ महिलांसह,बाजार पेठेमध्ये छोटे छोटे व्यवसाय करून उदार्निर्वह करणाऱ्या गरजू जेष्ठ महिलाना ब्लॅंकेटचे वाटप करून जणू मायेची उब दिली यावेळी इनरव्हील क्लबच्या अध्यक्षा वर्षा संतोष पार्टे यांनी जेष्ठ महिलांच्या अडचणी जाणून घेत पुढील काळात देखील आपल्याला लागेल ती मदत करण्यात येईल असे नमूद केले यावेळी सचिव सपना अरोरा तसेच सदस्या मुक्ता कोमटी, अदिती भांगडिया,नेहा साळवी, लक्ष्मी येरलागड्डा, शुभांगी खुरसणे सुप्रिया बागुल आदी सदस्या उपस्थित होत्या या प्रकल्पासाठी रूपाली, प्रशांत ओंबळे यांनी विशेष सहकार्य केलेया उपक्रमातून समाजात सेवाभाव व एकोप्याचा संदेश देण्यात आला