Type Here to Get Search Results !

Mahabaleshwar Times

Mahabaleshwar Times

महाबळेश्वर इनरव्हील क्लब अध्यक्षा वर्षा संतोष पार्टे यांचा राज्यस्तरीय समाज उत्कर्ष पुरस्काराने गौरव

 महाबळेश्वर इनरव्हील क्लब अध्यक्षा वर्षा संतोष पार्टे यांचा राज्यस्तरीय समाज उत्कर्ष पुरस्काराने गौरव 



​महाबळेश्वर टाईम्स 

महाबळेश्वर,  (प्रतिनिधी)

महाबळेश्वरच्या माजी नगराध्यक्षा व विद्यमान नगरसेविका विमलताई पार्टे आणि माजी नगराध्यक्ष स्व. पी. डी. शेठ पार्टे यांच्या स्नुषा, तसेच इनरव्हील क्लब ऑफ महाबळेश्वरच्या अध्यक्षा वर्षा संतोष पार्टे यांना सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल 'राज्यस्तरीय समाज उत्कर्ष पुरस्कारा'ने सन्मानित करण्यात आले. वाई येथील उद्योग उत्कर्ष सामाजिक संस्थेच्या ६ व्या वर्धापनदिनानिमित्त या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.

​वाई येथील महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या सत्यवती जोशी सभागृह (कन्या शाळा) येथे हा दिमाखदार सोहळा पार पडला. या कार्यक्रमात कला, कृषी, सामाजिक, शैक्षणिक, वैद्यकीय, औद्योगिक व व्यावसायिक अशा विविध क्षेत्रांत उल्लेखनीय काम करणाऱ्या मान्यवरांचा गौरव करण्यात आला.

​वर्षा संतोष पार्टे यांनी गेल्या वर्षभरात इनरव्हील क्लबच्या माध्यमातून महाबळेश्वर व परिसरामध्ये विविध समाजोपयोगी उपक्रम राबवले आहेत. समाजातील तळागाळातील आणि गरजू घटकांपर्यंत सातत्याने मदत पोहोचवण्याच्या त्यांच्या याच सेवेची दखल घेऊन त्यांना हा प्रतिष्ठेचा पुरस्कार प्रदान करण्यात आला.


हा सन्मान माझा एकटीचा नसून इनरव्हील क्लब ऑफ महाबळेश्वरच्या सर्व सदस्य, पदाधिकारी व सहकाऱ्यांच्या सामूहिक कष्टाचे फळ आहे. या पुरस्कारामुळे समाजसेवेचे कार्य अधिक जोमाने व समर्पणाने करण्याची नवी प्रेरणा मिळाली आहे, असे इनरव्हील क्लब, महाबळेश्वरच्या अध्यक्षा वर्षा पार्टे यांनी पुरस्कार स्वीकारताना सांगितले.

​या सोहळ्याला  निवासी उपजिल्हाधिकारी नागेश  पाटील, वाई अर्बन बँकेचे सीए राजेंद्र अमृत गाडगीळ, ज्येष्ठ समाजसेवक प्रभाकर रघुनाथ जोशी, निवृत्त शास्त्रज्ञ धर्मा मारुती काळे, श्याम चावलानी, श्री सिद्धेश्वर देवस्थानच्या विश्वस्त मनिषा शिरीष घैसास तसेच उद्योग उत्कर्ष सामाजिक संस्थेच्या सचिव तृप्ती गायकवाड आदी  उपस्थित होते.


​कार्यक्रमाच्या सुरुवातीला संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अभिषेक घागरे यांनी प्रमुख पाहुण्यांचे स्वागत केले, तर सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन विपिन नारायण वैराट यांनी केले.


​            बातम्या व जाहिराती साठी 📰 संपर्क

                 संपादक :- राहुल शेलार 

                  📱 9765576377

        कार्यकारी संपादक  :- रियाज मुजावर 

                 📱 9403546 485