परविर्तन संघटनेच्या वतीने आंबेनळी घाटातील वळण रस्त्यांवर सुरक्षा भिंती बांधण्याबाबत महाबळेश्वर तहसिलदार व सर्वजनिक बांधकाम विभागास निवेदन सादर .. महाबळेश्वर टाइम्स पाचगणी प्रतिनिधी- नौशाद सय्यद
अंबेनळी घाटात झालेल्या भीषण अपघात ८ जण मृत्यु पावले या पार्श्वभूमीवर परिवर्तन संघटनेच्या वतीने तहसीलदार महाबळेश्वर व सार्वजनिक बांधकाम विभाग
यांना निवेदन सादर करण्यात आले महाबळेश्वरकडे जाणारा आंबेनळी घाट हा अतिशय धोकादायक वळणांनी भरलेला असून, घाटामध्ये खोल दऱ्या मोठ्या प्रमाणात आहेत.
वळण रस्त्यांवर वाहन चालविताना अनेक वेळा चालकांना वाहन नियंत्रणात ठेवणे कठीण जाते त्यामुळे मोठा अपघात झाला आहे . व या पुढे भविष्यात अपघात रोखण्यासाठी लवकरात लवकर या वर उपाययोजना करण्यात यावी अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
महाबळेश्वर हे थंड हवेचे पर्यटनस्थळ असल्यामुळे येथे पर्यटकांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. त्यामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने तातडीने उपाययोजना करणे अत्यंत गरजेचे आहे.
👉 ज्या ठिकाणी तीव्र वळण रस्ते आहेत, त्या ठिकाणी मजबूत सुरक्षा भिंती (सुरक्षा गार्ड वॉल) उभारण्यात याव्यात.
👉 अपघात टाळण्यासाठी योग्य ती प्रतिबंधात्मक उपाययोजना तातडीने करण्यात यावी याकडे गांभीर्याने लक्ष देऊन लवकरात लवकर कार्यवाही करावी असे निवेदन परिवर्तन संघटनेच्या वतीने प्रदेश अध्यक्ष मंगेश कांबळे यांनी मागणी केली आहे.

Social Plugin