महाबळेश्वर आगारात एसटीच्या ७८ व्या वर्धापन दिनानिमित्त
१० नव्या राजमाता जिजाऊ बसेसचे दिमाखात पूजन
महाबळेश्वर टाईम्स
महाबळेश्वर(प्रतिनिधी)
राज्य परिवहन महामंडळाच्या ७८ व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून महाबळेश्वर आगारात नव्याने दाखल झालेल्या १० अत्याधुनिक राजमाता जिजाऊ बसेसचे पूजन अत्यंत उत्साहात संपन्न झाले. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा महाबळेश्वर तालुक्याचे सुपुत्र एकनाथ शिंदे यांच्या विशेष प्रयत्नातून या बसेस महाबळेश्वर आगाराला उपलब्ध झाल्या आहेत.
नव्या बसेस ताफ्यात दाखल झाल्यामुळे प्रवासी आणि एसटी कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे व समाधानाचे वातावरण पाहायला मिळत आहे. या कार्यक्रमादरम्यान ज्येष्ठ प्रवाशांच्या हस्ते केक कापून एसटी महामंडळाचा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. यावेळी जिल्हा बँकेचे राजू शेठ राजपुरे, जिल्हा परिषद सदस्य अजित संकपाळ, पंचायत समिती सभापती शकुंतला चोरमले, उपसभापती संजय मोरे, पंचायत समिती सदस्य संजय शेलार आगार व्यवस्थापक महेश जाधव, सहायक वाहतूक अधीक्षक प्राजक्ता मोहिते, आगार लेखाकार महेश शिंदे, सहायक कार्यशाळा अधीक्षक जयवंत केदार, वाहतूक निरीक्षक शाहरुख खान यांची प्रमुख उपस्थित होती.
प्रसिद्ध पर्यटन स्थळ असलेल्या महाबळेश्वर येथील एस.टी. बसस्थानकाला अखेर हक्काच्या १० नवीन आणि सुसज्ज बसेस मिळाल्या आहेत. या नव्या बसेस ताफ्यात दाखल झाल्यामुळे स्थानिक नागरिकांसह येणाऱ्या पर्यटकांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.
गेल्या काही काळापासून महाबळेश्वर आगारातील बसेसच्या कमतरतेमुळे आणि जुन्या गाड्यांमुळे प्रवाशांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत होते. विशेषतः पर्यटनाच्या हंगामात बसेस अपुऱ्या पडत असल्याने पर्यटकांचे हाल होत होते. या समस्येची दखल घेत उपमुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या प्रयत्नातून महाबळेश्वर स्थानकासाठी १० नवीन बसेस मंजूर केल्या असून, त्या आता सेवेत दाखल झाल्या आहेत.
या नवीन बसेस अत्याधुनिक सोयी-सुविधांनी युक्त आणि आरामदायी आहेत. महाबळेश्वरच्या डोंगराळ आणि वळणावृत घाटांच्या रस्त्यांवरून प्रवास करताना या नव्या गाड्यांमुळे प्रवाशांचा प्रवास अधिक सुरक्षित आणि सुखकर होणार आहे.
बसेस पुजन कार्यक्रमास सहायक वाहतूक निरीक्षक किरण धुमाळ,वरीष्ठ लिपिक विकास कांबळे, अजित जमदाडे, वाहतुक नियंत्रक विठ्ठल चव्हाण, संजय निकम, राहुल कुंभार, जयवंत जाधव,प्रशांत मिसाळ, संतोष ढेबे,अक्षय फडतरे, तालुका प्रमुख गणेश उतेकर,महाबळेश्वर शिवसेना प्रमुख विजय नायडू, प्रवीण भिलारे, संभाजी भिलारे, जे.के. अंबराळे, सचिन गुजर, चंद्रकांत संकपाळ, राजू पंडित, गौरव राक्षे, उस्मान खांरखंडे, प्रकाश पाटील, सचिन कदम, राहुल साळुंखे, किरण मोरे, राजेंद्र पवार, वर्षा आरडे, मेघा चोरगे, सतीश ओंबळे, सुनील ढेबे, मंगल फळणे, सोनाली बांदल व सुनीता फळणे आदी उपस्थित होते.
बातम्या व जाहिराती साठी 📰 संपर्क
संपादक :- राहुल शेलार
📱 9765576377
कार्यकारी संपादक :- रियाज मुजावर
📱 9403546 485


Social Plugin