महाबळेश्वर येथील फळणे वस्तीतील जिवंत झरा आणि रस्ते-लाईटच्या समस्येबाबत शिवसेनेचे नगराध्यक्षांना निवेदन.....
पावसाळ्यापूर्वी कामे सुरू करण्याचे नगराध्यक्ष सुनील शिंदे यांचे आश्वासन
महाबळेश्वर टाईम्स
महाबळेश्वर : प्रतिनिधी
महाबळेश्वर शिवसेना शहरच्या वतीने स्थानिक नागरिकांच्या विविध प्रलंबित आणि गंभीर समस्यांबाबत महाबळेश्वर नगरीचे नगराध्यक्ष सुनीलभाऊ शिंदे यांची भेट घेऊन त्यांना सविस्तर निवेदन देण्यात आले. यावेळी शहरातील प्रलंबित विकासकामे पावसाळा सुरू होण्यापूर्वी तातडीने मार्गी लावण्याची मागणी शिवसेनेच्या वतीने करण्यात आली.
यावेळी शिवसेनेच्या वतीने निवेदन देताना महिला उपतालुका मंगल ताई फळणे महाबळेश्वर शिवसेना शहर प्रमुख विजय भाऊ नायडू वाई संपर्क वर्षाताई आरडे पूर्व तालुका मेघा चोरगे उपजिल्हा वैद्यकीय सतीश ओंबळे तालुका वैद्यकीय राजूभाऊ पंडित उपतालुका संजय कांबळे अर्चना जाधव अल्पसंख्यांक शहर उस्मान खारखंडे शहर संघटक सुनील ढेबे उपशहर सचिन जेधे विभाग प्रमुख सचिन वाईकर शाखाप्रमुख राहुल साळुंखे व शिवसैनिक उपस्थित होते
फळणे वस्ती येथील एक मुख्य जिवंत झरा दगड आणि माती गेल्यामुळे पूर्णपणे मुजला आहे. यामुळे या भागातील लोकवस्तीला मिळणारा पाण्याचा मुख्य स्रोत बंद झाला असून नागरिकांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. या समस्येकडे प्रशासनाने तातडीने लक्ष देऊन झरा पूर्ववत करण्याची मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
रस्त्यांवरील अंधार आणि फळणे वस्तीकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर पथदिवे (लाईट) नसल्यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणावर अंधाराचे साम्राज्य असते. यामुळे स्थानिक महिला व नागरिकांची मोठी गैरसोय होत असून सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. तसेच, एम.पी.जी. क्लब ते बॉबींग्टन पॉईंट या मुख्य रस्त्याची दुरवस्था झाली असून रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले आहेत. या खराब रस्त्यामुळे वाहनचालकांना कसरत करावी लागत असून वाहनांचेही मोठे नुकसान होत आहे.
या सर्व गंभीर समस्यांवर नगराध्यक्ष सुनीलभाऊ शिंदे, नगरसेवक अफजलभाई सुतार आणि नगरसेवक रोहित ढेबे यांच्यासोबत सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी लोकप्रतिनिधींनी सकारात्मक प्रतिसाद देत, "महाबळेश्वर शहरातील ही सर्व कामे पावसाळा सुरू होण्याच्या आत लवकरात लवकर चालू करण्यात येतील, असे स्पष्ट आश्वासन दिले.
बातम्या व जाहिराती साठी 📰 संपर्क
संपादक :- राहुल शेलार
📱 9765576377
कार्यकारी संपादक :- रियाज मुजावर
📱 9403546 485


Social Plugin