Type Here to Get Search Results !

Mahabaleshwar Times

Mahabaleshwar Times

मान्सूनपूर्व तयारीला वेग; महाबळेश्वरमध्ये नगरपालिके मार्फत नाले सफाई कामे सुरू.

 मान्सूनपूर्व तयारीला वेग; महाबळेश्वरमध्ये नगरपालिके मार्फत  नाले सफाई  कामे सुरू.                                     महाबळेश्वर टाईम्स        


महाबळेश्वर : आगामी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर महाबळेश्वर नगरपालिकेमार्फत शहरातील नालेसफाईची कामे युद्धपातळीवर सुरू करण्यात आली आहेत. पावसाचे पाणी सुरळीत वाहून जावे व नागरिकांना पाणी साचण्याच्या समस्येला सामोरे जावे लागू नये, यासाठी विविध भागांतील नाले आणि गटारींची साफसफाई केली जात आहे.  नगराध्यक्ष सुनिल शिंदे व स्वच्छता व आरोग्य सभापती संजय जंगम व त्यांचे सहकारी नगरसेवक यांच्या नेतृत्वाखाली ही मोहीम राबविण्यात येत असून, नगरपालिकेचे अधिकारी व कर्मचारी प्रत्यक्ष कामावर लक्ष ठेवून आहेत. शहरातील प्रमुख रस्ते, बाजारपेठ परिसर तसेच पाणी साचण्याची शक्यता असलेल्या ठिकाणी विशेष भर देण्यात येत आहे.

मान्सूनपूर्व आवश्यक उपाययोजनांचा एक भाग म्हणून ही नालेसफाई मोहीम हाती घेण्यात आली असून, नागरिकांनीही परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन नगरपालिकेकडून करण्यात आले आहे. पावसाळ्यात कोणत्याही प्रकारची गैरसोय होऊ नये यासाठी नगरपालिका प्रशासन सज्ज असल्याचे यावेळी सांगण्यात आले.