Type Here to Get Search Results !

Mahabaleshwar Times

Mahabaleshwar Times

कांदाटी, कोयना व सोळशी विभागातील नागरिकांसाठी खुशखबर बोरीवली-महाबळेश्वर-लामज साप्ताहिक एस.टी. बस सेवा सुरू

कांदाटी, कोयना व सोळशी विभागातील नागरिकांसाठी खुशखबर
बोरीवली-महाबळेश्वर-लामज साप्ताहिक एस.टी. बस सेवा सुरू



महाबळेश्वर टाईम्स 
महाबळेश्वर : प्रतिनिधी 

महाबळेश्वर येथील तापोळा,कांदाटी, कोयना आणि सोळशी खोऱ्यातील दुर्गम भागातील नागरिकांचा मुंबई-पुण्यासारख्या शहरांशी प्रवास अधिक सुकर व्हावा, यासाठी 'बोरीवली - महाबळेश्वर - लामज' ही नवीन साप्ताहिक एस.टी. बस सेवा सुरू करण्यात आली आहे. या नवीन बस सेवेमुळे मुंबईत राहणाऱ्या चाकरमान्यांना आणि स्थानिक ग्रामस्थांना मोठा दिलासा मिळाला असून, परिसरात आनंदाचे वातावरण आहे.
राज्याचे उपमुख्यमंत्री  एकनाथजी शिंदे साहेब आणि परिवहन मंत्री तथा महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे अध्यक्ष  प्रताप सरनाईक साहेब यांच्या माध्यमातून तसेच महेश शिंदे यांच्या विशेष सहकार्यातून व पाठपुराव्यातून ही हक्काची बस सेवा प्रवाशांच्या सेवेत दाखल झाली आहे.

शनिवार व रविवारी  धावणार लालपरी

दुर्गम भागातील नागरिकांची निकड लक्षात घेऊन ही बस सेवा साप्ताहिक (शनिवार आणि रविवार) स्वरूपात चालवली जाणार आहे. आठवड्याच्या शेवटी प्रवास करणाऱ्या नोकरदार, व्यावसायिक आणि विद्यार्थ्यांना या फेरीचा मोठा फायदा होणार आहे.
बसचा मार्ग पुढीलप्रमाणे असेल: ही बस मुंबईतील प्रमुख उपनगरांना थेट महाबळेश्वर आणि लामज गावांशी जोडणार आहे.
मार्ग: बोरीवली - कांदिवली - मालाड - गोरेगाव - जोगेश्वरी - अंधेरी - असल्पा - सायन - पनवेल - महाड - पोलादपूर - महाबळेश्वर - तापोळा - आहीर - दरे - लामज (अंतिम थांबा)
 मुंबईतील बोरीवली, अंधेरी, सायनसारख्या भागात कांदाटी आणि कोयना परिसरातील मोठ्या प्रमाणावर नागरिक राहतात. गावी ये-जा करण्यासाठी त्यांना थेट आणि हक्काचे साधन नव्हते. ही नवी एस.टी. सेवा सुरू झाल्यामुळे या भागातील वाहतुकीचा प्रश्न सुटला आहे. या महत्त्वपूर्ण सुविधेबद्दल कांदाटी, कोयना व सोळशी विभागातील सर्व ग्रामस्थांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक आणि महेश शिंदे यांचे मनापासून आभार मानले आहेत.

        बातम्या व जाहिराती साठी 📰 संपर्क
                 संपादक :- राहुल शेलार 
                     📱 9765576377
          कार्यकारी संपादक :- रियाज मुजावर 
                     📱 9403546 485