Type Here to Get Search Results !

Mahabaleshwar Times

Mahabaleshwar Times

महाबळेश्वर ग्रामीण रुग्णालयाला जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राहुल जाधव यांची अचानक भेट; आरोग्यविषयक कामकाजाबद्दल व्यक्त केले समाधान

 महाबळेश्वर ग्रामीण रुग्णालयाला जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राहुल जाधव यांची अचानक भेट; आरोग्यविषयक कामकाजाबद्दल व्यक्त केले समाधान.....


महाबळेश्वर टाईम्स 

महाबळेश्वर : प्रतिनिधी 

महाबळेश्वर येथील ग्रामीण रुग्णालयाला सातारा जिल्ह्याचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राहुल जाधव यांनी अचानक भेट देऊन पाहणी केली. या भेटीदरम्यान त्यांनी रुग्णालयातील विविध आरोग्यविषयक उपक्रमांचा आणि कामकाजाचा सविस्तर आढावा घेतला, तसेच रुग्णालयातील एकूण व्यवस्थेबाबत समाधान व्यक्त केले.


डॉ. राहुल जाधव यांनी ग्रामीण रुग्णालयातील शवविच्छेदन कक्षाला (Post-Mortem Room) भेट देऊन पाहणी केली. यावेळी त्यांनी कक्षातील अनावश्यक वस्तू तातडीने हटविण्याच्या सूचना संबंधित कर्मचाऱ्यांना दिल्या. यानंतर त्यांनी रुग्णालयातील लसीकरण मोहिमेच्या कामाचा आढावा घेतला. लसीकरणाचे काम पाहत असताना कर्मचाऱ्यांनी त्यांच्यासमोरील काही तांत्रिक अडचणी जिल्हा शल्य चिकित्सकांच्या निदर्शनास आणून दिल्या. या अडचणींची गांभीर्याने दखल घेत डॉ. जाधव यांनी तात्काळ जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांना फोन करून या तांत्रिक समस्या लवकरात लवकर सोडवण्याचे आदेश दिले.

रुग्णालय आणि परिसरामध्ये राखण्यात आलेली स्वच्छता पाहून त्यांनी विशेष समाधान व्यक्त केले. तसेच रुग्णालयाच्या आवारात नव्याने सुरू असलेल्या बांधकामाचीही त्यांनी प्रत्यक्ष पाहणी केली. या दौऱ्यादरम्यान डॉ. जाधव यांनी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या रुग्णांची आणि त्यांच्या नातेवाईकांची प्रत्यक्ष भेट घेऊन विचारपूस केली व त्यांना मिळणाऱ्या वैद्यकीय सुविधांचा आढावा घेतला. रुग्णालयाच्या एकंदरीत उत्कृष्ट कामकाजाचे कौतुक करत, आगामी काळात रुग्णालयाच्या विकासासाठी आणि रुग्णसेवेसाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.


या अचानक भेटीदरम्यान महाबळेश्वर ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. पंडित देशमुख, उप वैद्यकीय अधीक्षक बाजीराव आम्राळे, डॉ. चंद्रशेखर लेले, रुग्णालयाचे सर्जन डॉ. खडतरे, स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. राजपूत, दिनेश मुळीक, सूरज बेलोशे, सोजो वर्गीस, जोजो जोस यांच्यासह रुग्णालयातील इतर वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


        बातम्या व जाहिराती साठी 📰 संपर्क

               संपादक :- राहुल शेलार 

                📱 9765576377

      कार्यकारी संपादक  :- रियाज मुजावर 

                📱 9403546 485