तापोळा येथील विहंगम गॅलरीस हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याची मागणी
महाबळेश्वर टाईम्स
महाबळेश्वर, प्रतिनिधी :
तापोळा येथे प्रस्तावित पुलाचे काम पूर्णत्वास आले असून त्या ठिकाणी उभारण्यात येणाऱ्या विहंगम गॅलरीस हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्यात यावे, अशी मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) महाबळेश्वर शहर शाखेच्या वतीने करण्यात आली आहे.
यासंदर्भात बांधकाम विभागाचे अभियंता अजय देशपांडे यांना निवेदन देण्यात आले. निवेदनात बाळासाहेब ठाकरे हे महाराष्ट्रासह जागतिक हिंदुत्वाचे प्रेरणास्थान असल्याने त्यांच्या नावाने या विहंगम गॅलरीचे नामकरण करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे.
तसेच महाबळेश्वर परिसरात पावसाळ्यात मोठ्या प्रमाणावर धुके पडत असल्यामुळे पर्यटक व स्थानिक नागरिकांच्या वाहनांना अपघाताचा धोका निर्माण होतो. हा धोका टाळण्यासाठी महाबळेश्वर–केळघर घाट, महाबळेश्वर–पाचगणी आणि महाबळेश्वर–प्रतापगड या मार्गांवर रस्त्यांच्या दोन्ही बाजूंना रिफ्लेक्टर बसविण्याचे आदेश संबंधित विभागांना देण्यात यावेत, अशीही मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.
यावेळी शहरप्रमुख राजाभाऊ गुजर, उपशहरप्रमुख राजेश साळवी, युवासेना शहरप्रमुख आकाश साळुंखे, शहनवाज खारखंडे, आसिफ माहापुळे, अली वारुणकर, तेजस बोधले, राहुल खरे यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते.


Social Plugin