महाबळेश्वरमध्ये शिवसेनेचा ६०वा वर्धापन दिन उत्साहात साजरा ; विविध सामाजिक उपक्रमांसह नव्या कार्यकर्त्यांचा जाहीर प्रवेश.....
महाबळेश्वर टाईम्स
महाबळेश्वर : प्रतिनिधी
शिवसेनेच्या ६०व्या वर्धापन दिनानिमित्त महाबळेश्वर शिवसेना शहराच्या वतीने विविध सामाजिक व विधायक उपक्रमांचे आयोजन करून वर्धापन दिन अत्यंत उत्साहात आणि जल्लोषात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात महाबळेश्वर येथील मुख्य छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे झाली. या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी करत आणि फटाक्यांची भव्य आतिषबाजी करत परिसर दणाणून सोडला.
याप्रसंगी बोलताना महाबळेश्वर शिवसेना शहरप्रमुख विजयभाऊ नायडू म्हणाले की,हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना स्थापन करण्यासाठी लावलेल्या छोट्याशा रोपट्याचे आज अथांग वटवृक्षात रूपांतर झाले आहे. त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून महाराष्ट्र राज्याचे आदरणीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब हे शिवसेनेची यशस्वी घोडदौड पुढे नेत आहेत, याचा आम्हा सर्व शिवसैनिकांना सार्थ अभिमान आहे.
शिवसेनेत धडाकेबाज प्रवेश
मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्वावर आणि धोरणांवर विश्वास ठेवून सातारा जिल्हा उपप्रमुख व पंचायत समिती सदस्य संजयभाऊ शेलार यांच्या प्रमुख उपस्थितीत महाबळेश्वरमधील अनेक कार्यकर्त्यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. यामध्ये दीपक भिलारे, सत्यम फळणे, अमोल फळणे यांच्यासह युवा कार्यकर्ते ऋषिकेश शिंदे व साहिल सुतार यांनी हाती भगवा घेतला. उपस्थित पदाधिकाऱ्यांनी त्यांचे पक्षात स्वागत केले.
वर्धापन दिनाचे औचित्य साधून शाळा क्रमांक ५ गणेशनगर हाऊसिंग सोसायटी येथे बालचमूंच्या हस्ते केक कापण्यात आला. तसेच येथील बालवाडी ते इयत्ता पाचवीच्या छोट्या चिमुकल्या विद्यार्थ्यांना वह्या आणि खाऊचे वाटप करण्यात आले.
यानंतर शेठ गंगाधर माखरिया हायस्कूल येथेही विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य (वह्या) आणि खाऊचे वाटप करण्यात आले. याच शाळेच्या आवारात शिवसेना शहरच्या वतीने पर्यावरणपूरक संदेश देत वृक्षारोपणही करण्यात आले.
पदाधिकाऱ्यांची मोठी उपस्थिती
या सर्व कार्यक्रमांना शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख संजयभाऊ शेलार, शहरप्रमुख विजयभाऊ नायडू, ज्येष्ठ शिवसैनिक वसंत फळणे गुरुजी, उपतालुकाप्रमुख संजय कांबळे, उपशहरप्रमुख सचिन गुजर, अल्पसंख्याक शहरप्रमुख उस्मानभाई खरखंडे, वैद्यकीय कक्ष शहरप्रमुख गोविंदभाऊ कदम, तालुका वैद्यकीय कक्ष प्रमुख राजाभाऊ पंडित, देवळी विभागप्रमुख दीपक जाधव, सोशल मीडिया जिल्हाप्रमुख गौरव राक्षे, विभागप्रमुख सचिन वाईकर, शाखाप्रमुख हर्ष साळुंखे, विभागप्रमुख प्रकाश जाधव, शाखाप्रमुख असलम डांगे, किरण मोरे आणि महाबळेश्वर शहर मीडिया प्रतिनिधी अक्षय सकपाळ उपस्थित होते.
महिला व युवा आघाडीची सक्रिय उपस्थिती:
महिला आघाडीच्या पूर्व महिला तालुकाप्रमुख मेघाताई चोरगे, वैद्यकीय तालुका महिला प्रमुख वर्षाताई आरडे, महिला शहरप्रमुख सुनीताताई फळणे, पूर्व उपतालुकाप्रमुख सोनाली बांदल, मंगल फळणे, आशाताई जाधव, अर्चना जाधव, शितल वाईकर, सुरेखा पंडित, सुवर्णा कदम यांच्यासह शिवसेनेचे सर्व आजी-माजी पदाधिकारी, शिवसैनिक आणि युवासैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बातम्या व जाहिराती साठी 📰 संपर्क
संपादक :- राहुल शेलार
📱 9765576377
कार्यकारी संपादक :- रियाज मुजावर
📱 9403546 485





Social Plugin