Type Here to Get Search Results !

Mahabaleshwar Times

Mahabaleshwar Times

महाबळेश्वर शहर शिवसेनेच्या वतीने शिवसेना वर्धापन दिन व बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी निमित्त सामाजिक उपक्रम संपन्न; वृक्षारोपण, छत्री व खाऊ वाटप.....

 महाबळेश्वर शहर शिवसेनेच्या वतीने शिवसेना वर्धापन दिन व बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी निमित्त सामाजिक उपक्रम संपन्न; वृक्षारोपण, छत्री व खाऊ वाटप.....

महाबळेश्वर टाईम्स

महाबळेश्वर : प्रतिनिधी 


हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षाचे औचित्य साधून तसेच १९ जून रोजी असणाऱ्या शिवसेना वर्धापन दिनानिमित्त, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) महाबळेश्वर शहर शाखेच्या वतीने विविध सामाजिक व पर्यावरणपूरक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या अंतर्गत महाबळेश्वर येथे मोठ्या उत्साहात वृक्षारोपण, शालेय मुला-मुलींना पावसाळी छत्र्यांचे वाटप आणि खाऊ वाटप करण्यात आले.

​या कार्यक्रमाला शिवसेना सातारा जिल्हाप्रमुख यशवंत घाडगे साहेब यांची मुख्य उपस्थिती लाभली होती. त्यांच्यासोबतच पक्षाचे अनेक ज्येष्ठ पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

​उपस्थित प्रमुख पदाधिकारी:

​राजेश कुंभारदरे (माजी जिल्हाप्रमुख)

​राजाभाऊ गुजर (शहर प्रमुख)

​राजेश साळवी, बाळकृष्ण ढेबे (उपशहर प्रमुख)

​सुजाताई मोरे (तालुका संघटिका), शिल्पा आडिया (महिला शहर संघटिका)

​वसुधा बगडे (संघटिका), लीलाताई शिंदे (माजी सातारा जिल्हा संघटिका)

​राजु बोधले (वाहतूक सेना), शंकर ढेबे (विभाग प्रमुख)

​चंद्रकांत पांचाळ (सोशल मीडिया जिल्हाप्रमुख)

​सामाजिक बांधिलकीतून विविध उपक्रम

​वर्धापन दिनाचे औचित्य साधून केवळ राजकीय सोहळा न करता सामाजिक बांधिलकी जपण्यावर भर देण्यात आला. महाबळेश्वर परिसराचे निसर्गसौंदर्य आणि पर्यावरण टिकवण्यासाठी वृक्षारोपण करण्यात आले. तसेच, पावसाळ्याची सुरुवात झाल्याने शालेय विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये म्हणून मुला-मुलींना पावसाळी छत्र्यांचे वाटप करण्यात आले. लहान मुलांना खाऊचे वाटप करून त्यांचा उत्साह वाढवण्यात आला.

​या प्रसंगी अंकुश ईगावे, अमोल साळुंखे, शाहनवाज भाई खरखंडे, अलीभाई वारुणकर, असिफभाई महापुळे, महाबळेश्वर अर्बन बँकेचे माजी चेअरमन मनोज ताथवडेकर, बाळकृष्ण (तात्या) साळुंखे, दत्ताभाऊ बावळेकर, नाट्य शिव प्रतिष्ठानचे किसन खामकर, रमेश शिंदे, समीर तांबोळी, रवींद्र बर्गे, सागर चिकणे, यश मोरे, राजेश सोंडकर आदींसह शिवसेना पक्षाचे सर्व अंगीकृत संघटनांचे पदाधिकारी, शिवसैनिक आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.