गिरिस्थान प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा
महाबळेश्वर टाईम्स
महाबळेश्वर, दि. २१ जून २०२६ :
गिरिस्थान प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालय, महाबळेश्वर येथे आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांचे शारीरिक व मानसिक आरोग्य सुदृढ राहावे तसेच योगाचे महत्त्व विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचावे या उद्देशाने विशेष योग सत्राचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमासाठी योग प्रशिक्षिका सौ. अश्विनी रोहित कोमटी यांनी प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित राहून विविध योगासने, प्राणायाम व ध्यान यांचे प्रात्यक्षिकांसह मार्गदर्शन केले. नियमित योगाभ्यासामुळे आरोग्य, एकाग्रता आणि सकारात्मकता वाढण्यास मदत होते, असे त्यांनी विद्यार्थ्यांना सांगितले.
प्राचार्या सौ. रोहिणी बगाडे यांच्या मार्गदर्शनाखाली योग सत्राचे नियोजनबद्ध व यशस्वी आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने योगासने करून कार्यक्रमात सक्रिय सहभाग नोंदविला.
या कार्यक्रमास महाबळेश्वर गिरिस्थान नगरपरिषदेचे नगराध्यक्ष सुनिल शिंदे, उपनगराध्यक्ष नासिर मुलाणी, मुख्याधिकारी योगेश पाटील, तसेच शिक्षण सभापती रोहित ढेबे यांनी शुभेच्छा दिल्या.
सदर कार्यक्रमावेळी प्रशालेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. व उत्साहपूर्ण आणि प्रेरणादायी वातावरणात योग दिन साजरा करण्यात आला.


Social Plugin