Type Here to Get Search Results !

Mahabaleshwar Times

Mahabaleshwar Times

पहिल्याच पावसात महाबळेश्वरचा प्रसिद्ध लिंगमळा धबधबा' ओसंडून वाहू लागला

 ​ पहिल्याच पावसात महाबळेश्वरचा प्रसिद्ध लिंगमळा धबधबा' ओसंडून वाहू लागला 



महाबळेश्वर टाईम्स 

​ महाबळेश्वर : प्रतिनिधी

राज्यात मान्सूनचे दमदार आगमन झाले असून, प्रसिद्ध पर्यटन स्थळ महाबळेश्वर आणि पाचगणी परिसरात गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. या पहिल्याच पावसाने येथील निसर्गाला नवसंजीवनी दिली असून, पर्यटकांचे मुख्य आकर्षण असलेला प्रसिद्ध लिंगमळा धबधबा अखेर ओसंडून वाहू लागला आहे.

​गेल्या काही दिवसांपासून कडक उन्हाळ्यामुळे कोरडा पडलेला हा धबधबा पहिल्या पावसातच प्रवाहित झाल्याने निसर्गाचे एक विहंगम दृश्य पाहायला मिळत आहे. डोंगराच्या कड्यावरून शेकडो फूट खाली कोसळणारे दुधासारखे पांढरे शुभ्र पाणी आणि अवतीभवती पसरलेली हिरवीगार झाडी पर्यटकांना भुरळ घालत आहे.

​धबधबा सुरू झाल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरताच महाबळेश्वरमध्ये पर्यटकांची पावले लिंगमळा परिसराकडे वळू लागली आहेत. धुक्याची चादर, अंगाला झोमणारा थंड वारा आणि त्यातच धबधब्याचे तुषार अंगावर झेलण्याचा आनंद पर्यटक घेत आहेत. या पावसामुळे स्थानिक व्यावसायिक, हॉटेल चालक आणि टॅक्सी चालकांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.


​पुढील काही दिवसांत पाऊस असाच सुरू राहिल्यास लिंगमळा धबधब्याचे रूप आणखीनच रौद्र आणि देखणे होईल, असा अंदाज वर्तवला जात आहे.


       बातम्या व जाहिराती साठी 📰 संपर्क

                संपादक :- राहुल शेलार 

                   📱 9765576377

         कार्यकारी संपादक  :- रियाज मुजावर 

                   📱 9403546 485