Type Here to Get Search Results !

Mahabaleshwar Times

Mahabaleshwar Times

महाबळेश्वर नगरपरिषद प्राथमिक शाळेत गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा; 'महाबळेश्वर टाईम्स' वतीने शालेय साहित्याचे वाटप

 महाबळेश्वर नगरपरिषद प्राथमिक शाळेत गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा; 'महाबळेश्वर टाईम्स' वतीने शालेय साहित्याचे वाटप.....



महाबळेश्वर टाईम्स 

​महाबळेश्वर : प्रतिनिधी

महाबळेश्वर नगरपरिषद प्राथमिक शाळा क्रमांक १ व २ येथे इयत्ता १ ली ते ५ वीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा अत्यंत उत्साहात आणि दिमाखात पार पडला. याप्रसंगी गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला, तसेच महाबळेश्वर टाईम्स'च्या वतीने विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. या सोहळ्याला विविध क्षेत्रातील मान्यवर, शिक्षक, पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


​कार्यक्रमाची सुरुवात उपस्थित मान्यवरांच्या उत्साही स्वागताने झाली. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते शालेय साहित्य देऊन सन्मानित करण्यात आले.

​याप्रसंगी बोलताना शिवसेना शहरप्रमुख विजयभाऊ नायडू यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले. ते म्हणाले की, विद्यार्थ्यांनी बालपणापासूनच चांगल्या सवयी आणि अभ्यासाची आवड जोपासली पाहिजे. आजचा सन्मान हा त्यांच्या कष्टाचे फळ असून, शिक्षकांनी घेतलेले परिश्रम वाखाणण्याजोगे आहेत.


​ज्येष्ठ पत्रकार संजय दस्तुरे यांनी आपल्या मनोगतातून पालकांच्या भूमिकेवर प्रकाश टाकला. विद्यार्थ्यांच्या यशात शिक्षकांइतकाच पालकांचाही मोठा वाटा असतो. मुलांच्या पाठीवर कौतुकाची थाप दिल्यास त्यांना अधिक उत्तम कामगिरी करण्याची प्रेरणा मिळते, असे त्यांनी नमूद केले.

​'महाबळेश्वर टाईम्स'चे संपादक व महाराष्ट्र पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष राहुल शेलार यांनी विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देत, सामाजिक बांधिलकी म्हणून शालेय साहित्य वाटपाचा उपक्रम राबविल्याचे सांगितले. तसेच उपस्थित मान्यवरांनी महाबळेश्वर टाईम्स व महाराष्ट्र पत्रकार संघाच्या या कौतुकास्पद उपक्रमाला व भावी वाटचालीस विशेष शुभेच्छा दिल्या.

​या सोहळ्याला अर्बन बँकेचे संचालक ॲडव्होकेट सतीश ओंबळे, नगरपालिकेचे मुख्य लिपिक बबन जाधव, सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब पांचाळ, डेमोक्रॅटिक पक्षाचे कामगार जिल्हाध्यक्ष ऋषिकेश वायदंडे, आकाश झाडे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष निलेश सपकाळ आणि जांभळे

​तसेच  महाबळेश्वर टाईम्स संपादक व महाराष्ट्र पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष राहुल शेलार,महाबळेश्वर टाईम्सचे कार्यकारी संपादक व उपतालुकाध्यक्ष रियाज मुजावर, सामाजिक कार्यकर्ते राकेश देवकुळे यांच्यासह शाळेचे मुख्याध्यापक यशवंत गोळे, शिक्षक दत्तात्रय पाडळे, रईसा शेख आणि रत्नावली ढेबे प्रामुख्याने उपस्थित होते.

​ सूत्रसंचालन मुख्याध्यापक यशवंत गोळे यांनी केले. गुणवंत विद्यार्थ्यांच्या यशाचा गौरव करत त्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी सर्व उपस्थितांनी सदिच्छा व्यक्त केल्या. आभार प्रदर्शनाने या यशस्वी सोहळ्याची सांगता झाली.


        बातम्या व जाहिराती साठी 📰 संपर्क

                संपादक :- राहुल शेलार 

                 📱 9765576377

        कार्यकारी संपादक :- रियाज मुजावर 

                 📱 9403546 485