Type Here to Get Search Results !

Mahabaleshwar Times

Mahabaleshwar Times

महाबळेश्वरच्या विकासासाठी तब्बल ₹१ कोटी १५ लाखांचा निधी मंजूर! ​शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे सातारा उपजिल्हाप्रमुख सतीश ओंबळे यांच्या पाठपुराव्याला मोठे यश

 महाबळेश्वरच्या विकासासाठी तब्बल ₹१ कोटी १५ लाखांचा निधी मंजूर!

शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे सातारा उपजिल्हाप्रमुख सतीश ओंबळे यांच्या पाठपुराव्याला मोठे यश


महाबळेश्वर टाईम्स 

महाबळेश्वर : (प्रतिनिधी)

महाबळेश्वर शहराच्या विकासाला गती देणारा एक मोठा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कट्टर समर्थक तसेच शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष, सातारा उपजिल्हाप्रमुख सतीशजी ओंबळे यांच्या सातत्यपूर्ण आणि प्रभावी पाठपुराव्याला अखेर मोठे यश आले असून, शहरासाठी तब्बल ₹१ कोटी १५ लाखांचा विकास निधी मंजूर करण्यात आला आहे. यावेळी नगरपालिकेचे मुख्याधिकारी योगेश पाटील उपस्थित होते.

​या निधीतून हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्मारक परिसराचे सुशोभीकरण आणि पर्यटकांच्या सुविधेसाठी अत्याधुनिक रुग्णवाहिकांची खरेदी केली जाणार आहे.

बाळासाहेब ठाकरे चौकाचा होणार कायापालट

​नगर विकास विभागाने २५ जून २०२६ रोजी काढलेल्या शासन निर्णयानुसार, वैभवस्थूपूर्ण योजनेअंतर्गत महाबळेश्वर नगरपरिषद येथील हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे चौकातील विकासकामांसाठी ₹७५ लाखांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या विकासकामामांमुळे महाबळेश्वरच्या सौंदर्यात आणखी भर पडणार असून पर्यटकांना आकर्षित करणारे एक उत्तम केंद्र येथे निर्माण होणार आहे.

वैद्यकीय सेवेला बळ: २ नवीन रुग्णवाहिका दाखल होणार

​त्याच दिवशी शासनाने काढलेल्या शुद्धीपत्रकाद्वारे महाबळेश्वर नगरपरिषदेस दोन अत्याधुनिक रुग्णवाहिका खरेदी करण्यासाठी ₹४० लाखांचा निधी मंजूर केला आहे. महाबळेश्वर हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे पर्यटन स्थळ असल्याने, येथे दरवर्षी लाखो पर्यटक भेट देतात. या रुग्णवाहिकांमुळे स्थानिक नागरिकांसह येथे येणाऱ्या लाखो पर्यटकांना तातडीच्या आणि आपत्कालीन वैद्यकीय सेवांचा मोठा लाभ वेळेत मिळणे शक्य होणार आहे.

शिवसैनिक आणि स्थानिक नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण

​महाबळेश्वर शहराच्या प्रलंबित आणि आवश्यक असलेल्या या दोन्ही कामांबाबत सतीशजी ओंबळे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. अखेर या प्रयत्नांना यश आल्याने संपूर्ण महाबळेश्वर परिसरातील शिवसैनिकांमध्ये आणि स्थानिक नागरिकांमध्ये प्रचंड समाधानाचे वातावरण आहे. या निधी मंजुरीबद्दल शिवसैनिकांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विशेष आभार मानले आहेत.


​"महाबळेश्वरच्या सर्वांगीण विकासासाठी आणि नागरिकांना मूलभूत सोयीसुविधा मिळवून देण्यासाठी मी कटिबद्ध आहे. यापुढेही शासन स्तरावर असाच सातत्याने पाठपुरावा सुरू ठेवून शहरासाठी अधिकाधिक निधी खेचून आणण्याचा माझा प्रामाणिक प्रयत्न राहील.

— सतीशजी ओंबळे (उपजिल्हाप्रमुख, शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष, सातारा)


       बातम्या व जाहिराती साठी 📰 संपर्क

                  संपादक :- राहुल शेलार 

                  📱 9765576377

        कार्यकारी संपादक :- रियाज मुजावर 

                 📱 9403546 485