Type Here to Get Search Results !

Mahabaleshwar Times

Mahabaleshwar Times

महाबळेश्वर दिवाणी व फौजदारी न्यायालय आजपासून सुसज्ज इमारतीत सुरू

महाबळेश्वर दिवाणी व फौजदारी न्यायालय आजपासून सुसज्ज इमारतीत सुरू





महाबळेश्वर टाईम्स                                              

 महाबळेश्वर प्रतिनिधी

महाबळेश्वर नगरपालिकेच्या वतीने नूतनीकरण करण्यात आलेल्या स्वतंत्र व सुसज्ज इमारतीतून आज, मंगळवार (दि. ३०) पासून महाबळेश्वर दिवाणी व फौजदारी न्यायालयाचे कामकाज अधिकृतपणे सुरू झाले . मान्यवरांच्या हस्ते फित कापून उद्घाटन करण्यात आले या वेळी प्रमुख पाहुणे  जिल्हा न्यायाधीश  ए . एस्. वाघमारे   न्यायमूर्ती यु. एस. ईवरे  महाबळेश्वर न्यायाधीश तसेच काळे साहेब कोर्ट मॅनेजर , देसाई साहेब जिल्हा रजिस्ट्रार , महाबळेश्वर तालुका वकिल संघाचे अध्यक्ष विजयकुमार दस्तुरे , व इतर मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले

  न्यायमूर्ती यु. एस. ईवरे  महाबळेश्वर उपस्थितीत नव्या इमारतीत न्यायालयीन कामकाजास प्रारंभ झाला  

यापूर्वी न्यायालयाचे कामकाज तहसील कार्यालयाकडे जाणाऱ्या रस्त्यावरील अग्निशामक दलाच्या प्रशिक्षण केंद्रात तात्पुरत्या स्वरूपात सुरू होते. मात्र, अपुऱ्या जागेमुळे वकील, पक्षकार तसेच न्यायालयीन कर्मचाऱ्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत होते.

या पार्श्वभूमीवर अनेक वर्षांपासून वापराविना असलेली पोलीस ग्राउंडजवळील जुन्या आठवडे बाजाराची इमारत न्यायालयासाठी भाडेतत्त्वावर देण्याचा निर्णय महाबळेश्वर नगरपालिकेने घेतला. 

या नव्याने सुसज्ज करण्यात आलेल्या न्यायालयीन इमारतीचे लोकार्पण महाराष्ट्र दिनी नगराध्यक्ष सुनील शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले होते. सर्व आवश्यक सुविधांनी सुसज्ज असलेल्या या स्वतंत्र इमारतीमुळे न्यायालयीन कामकाज अधिक सुलभ होणार असून, वकील आणि पक्षकारांना अपुऱ्या जागेच्या समस्येतून मोठा दिलासा मिळणार आहे.

आजपासून सुरू होणाऱ्या या नव्या पर्वाबद्दल महाबळेश्वर तालुका वकील संघ तसेच नागरिकांमधून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.                                                        

या प्रसंगी अँड प्रभाकर हिरवे, ॲड रेणूका ओंबळे, अँड भारती जगताप , ॲड लता मांजलकर , अँड संजय जंगम , अँड श्रीपाद ढाणक , अँड राजेश शिंदे , अँड वैशाली लोखंडे , ॲड विश्वास सांळुंखे, कल्याणी शेटे, अँड अमान बागवान, ॲड कदम , अँड शेख तसेच महाबळेश्वर कोर्ट सहाय्यक अधिक्षक जगताप तसेच कोर्ट कर्मचारी वर्ग व पिटिशन राईटर बाळासाहेब आखाडे इत्यादी  उपस्थित होते.