Type Here to Get Search Results !

Mahabaleshwar Times

Mahabaleshwar Times

जनता नागरी सहकारी पतसंस्थेतर्फे डॉ. आफान मानकर यांचा सत्कार

 जनता नागरी सहकारी पतसंस्थेतर्फे डॉ. आफान मानकर यांचा  सत्कार

महाबळेश्वर टाईम्स




जनता नागरी सहकारी पतसंस्थेचे सभासद डॉ. आफान मानकर यांनी वैद्यकीय क्षेत्रातील एमबीबीएस पदवी यशस्वीरित्या संपादन केल्याबद्दल जनता नागरी सहकारी पतसंस्थेच्या वतीने त्यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

या सत्कार समारंभात संस्थेचे चेअरमन असिफ मानकर, व्हाइस चेअरमन रियाज डांगे, माजी नगरसेवक फकिर भाई वलगे, संचालक नसीम पन्हाळकर, डॉ. सलीम मानकर, संजय साळुंखे, अकबर शारवान, राजमोहम्मद पन्हाळकर, तसेच व्यवस्थापक आरिफ शारवान, कर्मचारी वर्ग आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

यावेळी उपस्थित मान्यवरांनी डॉ. आफान मानकर यांचे अभिनंदन करून त्यांच्या भावी वैद्यकीय कारकिर्दीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. वैद्यकीय क्षेत्रात यशस्वी वाटचाल करत समाजसेवेचे कार्य अधिक जोमाने पार पाडावे, असा विश्वासही उपस्थितांनी व्यक्त केला.