महाबळेश्वर इनरव्हील क्लबकडून अंजुमन हायस्कूलला शैक्षणिक साहित्याची मदत
महाबळेश्वर टाईम्सग्रंथालयासाठी कपाट व विद्यार्थ्यांना २०० हून अधिक नोटबुकचे वितरण
महाबळेश्वर | प्रतिनिधी
महाबळेश्वर येथील इनरव्हील क्लबच्या वतीने अंजुमन खैरुल इस्लाम उर्दू हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयासाठी शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले. या उपक्रमांतर्गत शाळेच्या ग्रंथालयासाठी आवश्यक असलेले कपाट तसेच विद्यार्थ्यांसाठी २०० हून अधिक नोटबुक भेट देण्यात आली.
इनरव्हील क्लबच्या अध्यक्षा वर्षा पार्टे यांच्या हस्ते मुख्याध्यापिका श्रीमती शबाना असद इम्रान शेख यांच्याकडे या साहित्याचे सुपूर्द करण्यात आले. यावेळी क्लबच्या सचिव सपना अरोरा, अदिती भांगडिया, नेहा साळवी, लक्ष्मी येरलागड्डा, ॲड. राधा मुक्कावर तसेच अन्य सदस्य उपस्थित होत्या.
यावेळी अध्यक्षा वर्षा पार्टे यांनी सांगितले की, विद्यार्थ्यांमध्ये वाचन संस्कृतीला प्रोत्साहन मिळावे, तसेच शैक्षणिक सुविधा अधिक सक्षम व्हाव्यात हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश आहे. समाजोपयोगी व शिक्षणाभिमुख प्रकल्प राबविण्याचा इनरव्हील क्लब ऑफ महाबळेश्वरचा संकल्प अशा उपक्रमांद्वारे प्रत्यक्षात येत असल्याचे त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमाच्या शेवटी मुख्याध्यापिका श्रीमती शबाना असद इम्रान शेख यांनी इनरव्हील क्लबने दिलेल्या सहकार्याबद्दल मनःपूर्वक आभार व्यक्त केले.


Social Plugin