Type Here to Get Search Results !

Mahabaleshwar Times

Mahabaleshwar Times

डॉक्टर झाहीद आबिद वारुणकर Bachelor of Physiotherapy (BPT) ही पदवी यशस्वीरीत्या संपादन

 महाबळेश्वरच्या सुपुत्राची उज्ज्वल भरारी!

डॉक्टर झाहीद आबिद वारुणकर   Bachelor of Physiotherapy (BPT) ही पदवी यशस्वीरीत्या संपादन

महाबळेश्वर टाईम्स



महाबळेश्वर येथील गिरिस्थान प्रशालेचे माजी शिक्षक आबिद राजमोहम्मद वारुणकर सर तसेच MES स्कूलच्या माजी शिक्षिका झिनत मॅडम यांचे चिरंजीव डॉ. झाहिद आबिद वारुणकर यांनी बेंगळुरू येथील आचार्य इन्स्टिट्यूट ऑफ फिजिओथेरपी मधून Bachelor of Physiotherapy (BPT) ही पदवी उल्लेखनीय यशासह संपादन केली. शुक्रवार, दि. 17 जुलै 2026 रोजी पार पडलेल्या पदवीदान समारंभात त्यांना पदवी प्रदान करण्यात आली.


डॉ. झाहिद यांनी आपले प्राथमिक शिक्षण MES स्कूल, महाबळेश्वर, माध्यमिक शिक्षण संजीवन विद्यालय, पाचगणी, तर पुढील शिक्षण दिशा अकॅडमी, वाई येथे पूर्ण केले. सातत्यपूर्ण मेहनत, जिद्द आणि उत्कृष्ट शैक्षणिक कामगिरीच्या जोरावर त्यांनी BPT पदवी यशस्वीरित्या प्राप्त केली असून आता ते दयानंद युनिव्हर्सिटी, बगळुरू येथे पदव्युत्तर (PG) शिक्षण घेणार आहेत.


आपल्या जन्मभूमी महाबळेश्वर विषयी त्यांना विशेष प्रेम आणि अभिमान असून, उच्च शिक्षण पूर्ण करून भविष्यात महाबळेश्वर व परिसरातील नागरिकांना दर्जेदार आरोग्यसेवा देण्याचा त्यांचा मानस आहे. त्यांच्या या यशामुळे संपूर्ण महाबळेश्वरचे नाव अभिमानाने उंचावले आहे.


डॉ. झाहिद  यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल मा. नगराध्यक्ष, सर्व नगरसेवक, शिक्षकवृंद, नातेवाईक, मित्रपरिवार आणि सर्व महाबळेश्वरकरांकडून हार्दिक अभिनंदन व उज्ज्वल भविष्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा देण्यात आल्या