Type Here to Get Search Results !

Mahabaleshwar Times

Mahabaleshwar Times

महाबळेश्वरच्या विकासकामात हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही मंत्री मकरंद पाटील यांचा कडक इशारा

 महाबळेश्वरच्या विकासकामात हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही मंत्री मकरंद पाटील यांचा कडक इशारा 



महाबळेश्वर टाईम्स 

महाबळेश्वर : प्रतिनिधी

महाबळेश्वर हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे अग्रगण्य पर्यटन स्थळ असून, येथील पायाभूत सुविधा अत्यंत भक्कम व दर्जेदार करणे हे आपले मुख्य उद्दिष्ट आहे. साबणे रोडचे सुशोभीकरण आणि अंतर्गत रस्त्यांची कामे उच्च दर्जाची असावीत, जेणेकरून येथे येणाऱ्या पर्यटकांना आणि स्थानिक नागरिकांना कोणत्याही त्रासाला सामोरे जावे लागणार नाही. कामात हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही, असा इशारा मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी दिला.



 मदत व पुनर्वसन मंत्री श्री पाटील यांच्या अध्यक्षतेखाली महाबळेश्वर येथील हिरडा वन विश्रामगृह' येथे आयोजित करण्यात आलेल्या विविध विकास कामांच्या व आपत्कालीन सज्जतेच्या महत्त्वपूर्ण आढावा बैठक घेण्यात आली. या आढावा बैठकीस नगराध्यक्ष सुनील शिंदे, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक राजेंद्र राजपुरे, पंचायत समिती माजी सभापती संजय गायकवाड, स्वच्छता सभापती संजय जंगम, बांधकाम सभापती अफझल सुतार, शिक्षण सभापती रोहित ढेबे, महिला व बालकल्याण सभापती संगीता वाडकर, वनपरीक्षेत्र अधिकारी महादेव मोहिते, वनपाल सुनील लांडगे तसेच नगरसेवक संतोष आखाडे, नगरसेविका विमलताई पार्टे, विद्या बावळेकर, पल्लवी कोंढाळकर, प्रियंका वायदंडे, रेश्मा ढेबे, स्मिता पाटील, अर्बन बँकेचे संचालक शरद बावळेकर व अर्बन बँकेचे माजी अध्यक्ष दत्तात्रय वाडकर, यांच्यासह सर्व कामांचे मक्तेदार (ठेकेदार), प्रकल्प सल्लागार, महाबळेश्वर नगरपरिषदेचे सर्व विभागप्रमुख, सार्वजनिक बांधकाम विभागाचे , वन विभागाचे अधिकारी आणि पोलीस स्टेशन महाबळेश्वरचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.





​या बैठकीत महाबळेश्वरची मुख्य बाजारपेठ असलेल्या 'साबणे रोड' येथील सुशोभीकरणाच्या कामाचा सविस्तर आढावा घेण्यात आला. हे सुशोभीकरणाचे काम अत्यंत दर्जेदार आणि ठरवून दिलेल्या वेळेतच पूर्ण करण्याच्या दृष्टीने नामदार मकरंद पाटील यांनी संबंधित यंत्रणेला कडक सूचना दिल्या. तसेच महाबळेश्वर शहरात चालू असलेल्या पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचा व आपत्कालीन व्यवस्थापनाचा सखोल आढावा घेतला.

​प्रामुख्याने तापोळा रोड, एल. सी. डिसुजा रोड आणि क्षेत्र महाबळेश्वरकडे जाणाऱ्या रस्त्यांच्या कामांबाबत आढावा घेण्यात आला. हे रस्ते पर्यटनाच्या व स्थानिक नागरिकांच्या वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे असल्याने, पावसाचा अंदाज घेऊन या रस्त्यांची कामे प्राधान्याने हाती घेण्याचे निर्देश त्यांनी दिले. तसेच दिनांक ५ व ६ जुलै रोजी अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे प्रस्ताव तातडीने शासनाकडे सादर करण्याच्या सूचनाही मुख्यमंत्री पाटील यांनी दिल्या.

​या बैठकीत वन विभागाच्या अखत्यारित येणाऱ्या जागा, विकास कामांमधील तांत्रिक अडचणी आणि पर्यावरण समतोल राखून करावयाची कामे यावर वन विभागाच्या अधिकाऱ्यांना सकारात्मक दृष्टिकोन ठेवत सहकार्य करण्याच्या सूचना दिल्या. नगरपरिषद व वन विभागाने आपसात समन्वय राखून स्थानिक नागरिक व पर्यटकांची होणारी गैरसोय टाळण्याच्या दृष्टीने काम करावे, असे निर्देशही दिले.


साबणे रोडच्या सुशोभीकरणासह अंतर्गत रस्ते दर्जेदार आणि वेळेत पूर्ण करून घेण्यासाठी आम्ही युद्धपातळीवर प्रयत्न करत आहोत. वन विभाग आणि इतर शासकीय यंत्रणांशी समन्वय साधून पर्यटक आणि स्थानिक नागरिकांना सर्वोत्तम सुविधा देण्याला आमचे प्राधान्य राहील, असे बैठकीत नगराध्यक्ष सुनील शिंदे यांनी सांगितले.


​बैठकीच्या सुरुवातीला महाबळेश्वर गिरिस्थान नगरपरिषदेचे मुख्याधिकारी योगेश पाटील यांनी सुरू असलेल्या व नियोजित विकासकामांचे सविस्तर सादरीकरण  केले. तसेच मुख्य बाजारपेठ डॉ. साबणे रोड व परिसर सुशोभीकरण कामाबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता शिवप्रसाद धुमाळ यांनी सादरीकरण केले.


        बातम्या व जाहिराती साठी 📰 संपर्क

                संपादक :- राहुल शेलार 

                   📱 9765576377

          कार्यकारी संपादक :- रियाज मुजावर 

                   📱 9403546 485