Type Here to Get Search Results !

Mahabaleshwar Times

Mahabaleshwar Times

महाबळेश्वर शिवसेनेकडून वेण्णामाई व कोयनामाई जलपूजन; राज्याच्या सुख-समृद्धीसाठी साकडे

 महाबळेश्वर शिवसेनेकडून वेण्णामाई व कोयनामाई जलपूजन; राज्याच्या सुख-समृद्धीसाठी साकडे

महाबळेश्वर टाईम्स

महाबळेश्वर | प्रतिनिधी



महाबळेश्वर शिवसेना शहरच्या वतीने सालाबादप्रमाणे वेण्णा लेक येथे वेण्णामाई तसेच गेलेन औगल डॅम (भारत हॉटेल परिसर) येथे कोयनामाईची पारंपरिक परडी सोडून जलपूजन करण्यात आले. हा धार्मिक व पारंपरिक कार्यक्रम शिवसेना महिला पदाधिकारी आणि शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत उत्साहात पार पडला.


यावेळी शिवसेना शहरप्रमुख विजयभाऊ नायडू, माजी नगरसेविका विमलताई ओंबळे, महाबळेश्वर पूर्व तालुका महिला संघटिका मेघा चोरगे, उपतालुका महिला संघटिका सोनाली बांदल, शहर संघटिका सुनिता फळणे, आशा जाधव, उपशहर महिला संघटिका शितल वाईकर, अर्चना जाधव, प्रभा नायडू, युवा विभागाच्या अपूर्वा डोईफोडे, पूर्व उपतालुका प्रमुख संजय कांबळे, तालुका वैद्यकीय प्रमुख राजूभाऊ पंडित, शहर वैद्यकीय प्रमुख गोविंदभाऊ कदम, अल्पसंख्यांक शहरप्रमुख उस्मानभाई खारखंडे, शहर संघटक सुनील ढेबे, उपशहर प्रमुख सचिन जेधे, विभाग प्रमुख प्रकाश जाधव, सचिन वाईकर, विजय चोरगे, शाखाप्रमुख राहुल साळुंखे, किरण मोरे, असलम डांगे, यासीन वारुणकर यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


यावेळी शहरप्रमुख विजयभाऊ नायडू यांनी वेण्णामाई व कोयनामाईच्या चरणी परडी भरून महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांना उत्तम आरोग्य लाभावे, त्यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राची प्रगती होत राहावी तसेच महाबळेश्वर शहरातील प्रत्येक कुटुंब व नागरिकांवर वेण्णामाई-कोयनामाईची कृपादृष्टी कायम राहावी, अशी प्रार्थना केली.


कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांनी वेण्णामाई व कोयनामाईच्या नावाने जयघोष करत धार्मिक वातावरणात जलपूजन सोहळ्याची सांगता केली.