महाबळेश्वर तालुक्यातील भिलार येथे निसर्गाचा चमत्कार: गायीने दिला जुळ्या वासरांना जन्म!
एक गोऱ्हा आणि एक कालवड; शेतकरी सुरेश गोरे यांच्या घरी आनंदाचे वातावरण
महाबळेश्वर टाईम्स
महाबळेश्वर (प्रतिनिधी)
महाबळेश्वर तालुक्यातील स्ट्रॉबेरीचे गाव म्हणून प्रसिद्ध असलेल्या भिलार येथून एक अत्यंत दुर्मिळ आणि आनंदाची बातमी समोर आली आहे. भिलार येथील प्रगतशील शेतकरी श्री. सुरेश धोंडीबा गोरे यांच्या पाळीव गायीने चक्क जुळ्या वासरांना जन्म दिला आहे. यामध्ये एक गोऱ्हा (बैल) आणि एक कालवड (गाय) असून, या अनोख्या निसर्गाच्या चमत्काराने गोरे परिवारासह संपूर्ण परिसरात आनंदाचे वातावरण आहे.
पशुवैद्यकीय क्षेत्रात गायीने जुळ्या वासरांना जन्म देणे ही अत्यंत दुर्मिळ घटना मानली जाते. शेतकरी सुरेश गोरे यांच्या गायीने कोणतीही अडचण न येता नैसर्गिकरित्या या दोन्ही वासरांना जन्म दिला. सध्या गाय आणि तिची दोन्ही वासरे पूर्णपणे निरोगी आणि सुदृढ आहेत.
"आमच्या कपिला गायीने एकाच वेळी दोन गोड वासरांना जन्म देऊन आमच्या घरात सुख-समृद्धी आणली आहे. एकाच वेळी गोऱ्हा आणि कालवड घरात आल्यामुळे जणू लक्ष्मी आणि सुश्या (नंदी) दोघेही एकत्र अवतरले आहेत, अशीच आमची भावना आहे," अशी आनंदमयी प्रतिक्रिया शेतकरी सुरेश गोरे यांनी दिली.
भिलार आणि परिसरातील ग्रामस्थांनी गोरे यांच्या घरी जाऊन या जुळ्या वासरांना पाहण्यासाठी आणि गोरे कुटुंबाचे अभिनंदन करण्यासाठी गर्दी केली आहे. ग्रामीण भागात या दुर्मिळ घटनेचे मोठे कुतूहल आणि कौतुक व्यक्त होत आहे.
बातम्या व जाहिराती साठी 📰 संपर्क
संपादक :- राहुल शेलार
📱 9765576377
कार्यकारी संपादक :- रियाज मुजावर
📱 9403546 485


Social Plugin