Type Here to Get Search Results !

Mahabaleshwar Times

Mahabaleshwar Times

​महाबळेश्वरचे नवनिर्वाचित पोलीस निरीक्षक हर्षद गालींदे यांचा महाबळेश्वर शिवसेनेच्या वतीने जाहीर सत्कार

 ​महाबळेश्वरचे नवनिर्वाचित पोलीस निरीक्षक हर्षद गालींदे  यांचा महाबळेश्वर शिवसेनेच्या वतीने जाहीर सत्कार.....!



महाबळेश्वर टाईम्स 

​महाबळेश्वर :  प्रतिनिधी

महाबळेश्वर पोलीस स्टेशनचे नवनिर्वाचित पोलीस निरीक्षक हर्षद गालींदे साहेब यांचा महाबळेश्वर शिवसेना शहराच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौक येथील श्री दुर्गा मंदिर परिसरात भव्य सत्कार करण्यात आला. महाबळेश्वर उपतालुका (पूर्व) चे संजय भाऊ कांबळे यांच्या वतीने गालींदे साहेब यांना सन्मानित करण्यात आले.

​महाबळेश्वर हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे पर्यटन स्थळ असल्याने येथील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासोबतच स्थानिक नागरिक आणि पर्यटकांशी सलोख्याचे संबंध राखणे महत्त्वाचे असते. नवनियुक्त पोलीस निरीक्षक हर्षद गालींदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस प्रशासन अधिक प्रभावीपणे काम करेल, असा विश्वास यावेळी शिवसेना पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.

​या सत्कार सोहळ्याप्रसंगी महाबळेश्वर शिवसेना शहरप्रमुख विजय भाऊ नायडू, माजी नगरसेविका विमलताई ओंबळे आणि महाबळेश्वर पूर्व उपतालुका प्रमुख संजय कांबळे यांच्यासह सुनील ढेबे (शहर संघटक),सचिन जेधे (उपशहर प्रमुख),राजूभाऊ पंडित (वैद्यकीय तालुका प्रमुख),गोविंद भाऊ कदम (शहर वैद्यकीय प्रमुख),उस्मान भाई खारखंडे (अल्पसंख्यांक शहर प्रमुख),विजय चोरगे, सचिन वाईकर, प्रकाश पाटील (विभाग प्रमुख)किरण मोरे,राहुल साळुंखे, अस्लम डांगे (शाखाप्रमुख),यासीन वारुणकर उपस्थित होते.



महिला पदाधिकाऱ्यांची लक्षणीय उपस्थिती होते

या कार्यक्रमाला शिवसेना महिला आघाडीच्या वतीनेही मोठ्या संख्येने महिला पदाधिकारी उपस्थित होत्या. यामध्ये प्रामुख्याने मेघा चोरगे (पूर्व तालुका महिला संघटिका),सोनाली बांदल (पूर्व उपतालुका महिला प्रमुख),सुनीता फळणे, आशा जाधव (महाबळेश्वर शहर संघटिका),शितल वाईकर, अर्चना जाधव (महिला उपशहर संघटिका),प्रभा नायडू,अपूर्वा डोईफोडे (महिला विभाग प्रमुख)या सत्कार समारंभाप्रसंगी महाबळेश्वर शिवसेनेचे इतर स्थानिक पदाधिकारी, युवासेना कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते. कार्यक्रमाची सांगता उत्साही वातावरणात झाली.


        बातम्या व जाहिराती साठी 📰 संपर्क

               संपादक :- राहुल शेलार 

                  📱 9765576377

          कार्यकारी संपादक  :- रियाज मुजावर 

                  📱 9403546 485