Type Here to Get Search Results !

Mahabaleshwar Times

Mahabaleshwar Times

महाबळेश्वर इनर व्हील क्लबकडून माचुतर जि. प. शाळेला कपाट व शैक्षणिक साहित्य भेट

 महाबळेश्वर इनर व्हील क्लबकडून माचुतर जि. प. शाळेला कपाट व शैक्षणिक साहित्य भेट

महाबळेश्वर | प्रतिनिधी


महाबळेश्वर येथील इनर व्हील क्लबच्या वतीने तालुक्यातील जिल्हा परिषद आदर्श केंद्र शाळा, माचुतर येथील ग्रंथालयासाठी आवश्यक असलेले कपाट तसेच विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्य भेट देण्यात आले.

इनर व्हील क्लबच्या अध्यक्षा वर्षा संतोष पार्टे यांच्या हस्ते मुख्याध्यापक लक्ष्मण जाधव, संतोष चोरगे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सचिन शिंदे यांच्याकडे हे साहित्य सुपूर्द करण्यात आले. यावेळी अजय आखाडे यांच्यासह क्लबच्या सचिव सपना अरोरा, अदिती भांगडिया, नेहा साळवी, लक्ष्मी येरलागड्डा, ॲड. राधा मुक्कावर तसेच इतर क्लब सदस्या उपस्थित होत्या.

यावेळी बोलताना अध्यक्षा वर्षा पार्टे यांनी विद्यार्थ्यांमध्ये वाचन संस्कृती रुजविणे, शाळेचे ग्रंथालय अधिक सक्षम करणे आणि शैक्षणिक सुविधांमध्ये वाढ करणे हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश असल्याचे सांगितले. समाजोपयोगी व शिक्षणाभिमुख प्रकल्पांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी इनर व्हील क्लब ऑफ महाबळेश्वर सातत्याने कार्यरत असल्याचे त्यांनी नमूद केले.

उपस्थित मान्यवरांनी इनर व्हील क्लब ऑफ महाबळेश्वरच्या या समाजाभिमुख उपक्रमाचे कौतुक करत शाळेला दिलेल्या मोलाच्या सहकार्याबद्दल क्लबचे आभार मानले.