शिवसेनेच्या वतीने मतिमंद मुलांना शालेय साहित्य व खाऊ वाटप.....
उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त वाई येथे सामाजिक उपक्रम.....
महाबळेश्वर टाईम्स
महाबळेश्वर : प्रतिनिधी
हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त तसेच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून शहर शिवसेनेच्या वतीने वाई येथील मतिमंद मुलांच्या शाळेत शालेय साहित्य व खाऊ वाटप करण्यात आले.
या उपक्रमांतर्गत वाई येथील 'रेव्हीका साहिल अक्षय इन्स्टिट्यूट'मधील मतिमंद विद्यार्थ्यांना आवश्यक शालेय वस्तू आणि खाऊचे वाटप करण्यात आले. तसेच, विशेष मुलांची अविरत सेवा करणाऱ्या संस्थेच्या संस्थाचालकांचा व कर्मचाऱ्यांचा शहर शिवसेनेच्या वतीने विशेष सत्कार करण्यात आला.
या वेळी महाबळेश्वर शिवसेना शहर प्रमुख(उध्दव बाळासाहेब ठाकरे ) राजाभाऊ गुजर, युवासेना शहर प्रमुख आकाश साळुंखे, राजेश साळवी, रामदास जाधव, सुशांत पारठे आणि शाहवाज खरखंडे यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
शिवसेनेच्या या सामाजिक उपक्रमाबद्दल शाळेच्या मुख्याध्यापिका शुभांगी टापरे, कार्यशाळा प्रमुख विजय कर्णे, कलाशिक्षक आनंदराव माने आणि गौरव खाडे यांनी शहर शिवसेनेचे मनःपूर्वक आभार मानले.
बातम्या व जाहिराती साठी 📰 संपर्क
संपादक :- राहुल शेलार
📱 9765576377
कार्यकारी संपादक :- रियाज मुजावर
📱 9403546 485


Social Plugin