महाबळेश्वर: वेण्णा नदीचे रुंदीकरण व खोलीकरण पूर्ण; पूर परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यात पालिकेला यश
महाबळेश्वर टाईम्स
महाबळेश्वर शहराला दरवर्षी पावसाळ्यात भेडसावणाऱ्या पूर परिस्थितीवर मात करण्यासाठी महाबळेश्वर नगरपालिकेने एक अत्यंत महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. महाबळेश्वरचे नगराध्यक्ष सुनील शिंदे, स्थानिक नगरसेवक आणि मुख्याधिकारी योगेश पाटील यांच्या विशेष प्रयत्नातून वेण्णा नदी पात्रातील गाळ काढण्याचे काम अत्यंत जलद गतीने पूर्ण करण्यात आले आहे.नदी पात्रातील गाळ उपसण्यासाठी प्रशासनाने २ मोठ्या पोकलेन यंत्रांचा वापर केला होता. अत्यंत नियोजनबद्ध रीतीने राबवलेल्या या मोहिमेमुळे वेण्णा नदी पात्रातील गाळ काढून त्याची खोली वाढवण्यात आली असून, नदीचे पात्रही रुंद करण्यात आले आहे. हे संपूर्ण आव्हानात्मक काम नगरपालिकेने अवघ्या १० दिवसांत यशस्वीरित्या पूर्ण करून दाखवले.या धडक मोहिमेमुळे गेल्या अनेक वर्षांपासून नदीकाठच्या रहिवाशांना आणि व्यापाऱ्यांना भेडसावणारी पुराची मोठी समस्या आता दूर झाली आहे. दरवर्षी मुसळधार पावसामुळे वेण्णा नदीचे पाणी पात्राबाहेर पडून लगतच्या परिसराचे प्रचंड नुकसान होत असे. ही गंभीर बाब लक्षात घेऊन प्रशासनाने तातडीने नियोजन करून हे काम हाती घेतले होते. या यशस्वी कामगिरीमुळे यंदाच्या पावसाळ्यात परिसरातील पूर सदृश परिस्थिती कमी करण्यात पालिकेला मोठे यश आले आहे. नदीची पाणी वहन क्षमता वाढल्याने पाण्याचा निचरा वेगाने होत असून, स्थानिक नागरिकांनी नगरपरिषद प्रशासनाचे मनापासून आभार मानले आहेत.


Social Plugin