महाबळेश्वरमध्ये पावसाची धुवांधार बॅटिंग; वेण्णा लेक ओसंडून वाहू लागला.....
महाबळेश्वर टाईम्स
महाबळेश्वर प्रतिनिधी
महाराष्ट्राचे नंदनवन आणि पावसाचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या प्रसिद्ध पर्यटन स्थळ महाबळेश्वर तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाची संततधार सुरू आहे. या मुसळधार पावसामुळे महाबळेश्वर आणि पाचगणी परिसर पूर्णपणे चिंब झाला असून, येथील मुख्य आकर्षण असलेला आणि महाबळेश्वरची जीवनवाहिनी मानला जाणारा वेण्णा लेक पूर्णपणे भरून ओसंडून वाहू लागला आहे. तलावाच्या सांडव्यावरून पाणी वाहू लागल्याने निसर्गाचे एक विहंगम दृश्य पाहायला मिळत आहे.
पावसाने ओलांडला ४७ इंचाचा टप्पा
महाबळेश्वरमध्ये यंदा पावसाने जोरदार बॅटिंग केली असून, पावसाने तब्बल ४७ इंचाचा टप्पा पूर्ण केला आहे. अधिकृत नोंदीनुसार, आतापर्यंत येथे ४४.४१७ इंच म्हणजेच १२०४.४० मिमी पावसाची नोंद झाली आहे. सतत पडणाऱ्या या पावसामुळे संपूर्ण परिसर हिरवागार झाला असून निसर्गाने जणू हिरवी शाल पांघरली आहे.
धुवांधार पाऊस, कोसळणारे फेसाळते धबधबे आणि सोबतीला दाट धुके यामुळे महाबळेश्वरचे सौंदर्य अधिकच खुलले आहे. हे रूप डोळ्यांत साठवण्यासाठी पर्यटकांनी महाबळेश्वर आणि पाचगणीत मोठी गर्दी केली आहे.
दाट धुके आणि थंडगार वाऱ्यात पावसाच्या सरी अंगावर झेलत पर्यटक वेण्णा लेक परिसरात फिरण्याचा आनंद घेत आहेत. या गुलाबी थंडीत गरमागरम भाजलेला मका आणि मका पॅटीसचा आस्वाद घेणे, तसेच घोड्यावर बसून फेरफटका मारणे पर्यटकांसाठी विशेष आकर्षण ठरत आहे.
धुके आणि पावसाच्या लपंडावात महाबळेश्वरचा निसर्ग पर्यटकांना अक्षरशः भुरळ घातली आहे.
बातम्या व जाहिराती साठी 📰 संपर्क
संपादक :- राहुल शेलार
📱 9765576377
कार्यकारी संपादक :- रियाज मुजावर
📱 9403546 485


Social Plugin