Type Here to Get Search Results !

Mahabaleshwar Times

Mahabaleshwar Times

महाबळेश्वर-तापोळा रस्ता बंद; ग्लेन ओगल डॅमजवळ झाड कोसळल्याने वाहतूक ठप्प

 महाबळेश्वर-तापोळा रस्ता बंद; ग्लेन ओगल डॅमजवळ झाड कोसळल्याने वाहतूक ठप्प




महाबळेश्वर टाईम्स 

महाबळेश्वर : प्रतिनिधी 

महाबळेश्वर आणि परिसरामध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे महाबळेश्वर-तापोळा रस्त्यावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. ग्लेन ओगल डॅम  परिसरातील हॉटेल फाउंटन समोर एक प्रचंड मोठे झाड रस्त्यावर कोसळल्याने हा मार्ग दोन्ही बाजूंनी बंद झाला आहे.

​मिळालेल्या प्राथमिक माहिती नुसार अचानक हे झाड रस्त्याच्या मधोमध उन्मळून पडले. सुदैवाने, झाड कोसळले त्या क्षणी तिथून कोणतेही वाहन जात नसल्याने मोठी जीवितहानी किंवा अपघात टळला आहे. मात्र, महाबळेश्वरला तापोळा आणि बामणोली परिसराशी जोडणारा हा मुख्य रस्ता आहे.

प्रशासनाकडून युद्धपातळीवर काम सुरू

​घटनेची माहिती मिळताच स्थानिक प्रशासन, आपत्ती व्यवस्थापन टीम आणि नगरपालिका विभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. जे सी बी साहाय्याने झाड बाजुला सरकुन रस्ता मोकळा करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. मात्र, झाड मोठे असल्याने रस्ता पूर्णपणे साफ होण्यासाठी आणखी काही तासांचा अवधी लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

जोपर्यंत रस्त्यावरील झाड हटवले जात नाही, तोपर्यंत वाहनधारकांनी या मार्गावरून प्रवास करणे टाळावे आणि प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन स्थानिक प्रशासनाकडून करण्यात आले आहे.


         बातम्या व जाहिराती साठी 📰 संपर्क

                संपादक :- राहुल शेलार 

                    📱 9765576377

          कार्यकारी संपादक  :- रियाज मुजावर 

                     📱 9403546 485