Type Here to Get Search Results !

Mahabaleshwar Times

Mahabaleshwar Times

महाबळेश्वर नगरपालिकेत अण्णाभाऊ साठे जयंती उत्साहात साजरी


 महाबळेश्वर नगरपालिकेत अण्णाभाऊ साठे जयंती उत्साहात साजरी                  


महाबळेश्वर टाईम्स


साहित्यसम्राट, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त महाबळेश्वर नगरपालिकेत अभिवादनाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. यावेळी अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले. तसेच त्यांच्या साहित्याचा वारसा समाजापर्यंत पोहोचावा या उद्देशाने नगराध्यक्ष व सर्व नगरसेवकांना 'फकिरा', 'वारणेचा वाघ', 'माकडीचा माळ' यांसह अण्णाभाऊ साठे यांच्या गाजलेल्या कादंबऱ्यांचे वितरण करण्यात आले.


याप्रसंगी नगराध्यक्ष सुनिलशेठ शिंदे यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या कार्याला अभिवादन करताना सांगितले की, "संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात मोलाची भूमिका बजावत या चळवळीला नवी दिशा देणारे, शोषित-वंचितांच्या हक्कासाठी बुलंद आवाज उठवणारे आणि आपल्या ओजस्वी लेखणीतून समता, स्वाभिमान व सामाजिक न्यायाची प्रेरणा जनमानसात रुजवणारे साहित्यसम्राट, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे कार्य, विचार आणि सामाजिक योगदान महाराष्ट्राला सदैव प्रेरणा देत राहील."


कार्यक्रमास नगरसेविका प्रियंका ताई अक्षय वायदंडे, संगीताताई वाडकर, पल्लवी ताई कोंढाळकर, नगरसेवक राहुल भाऊ पिसाळ, समाजसेवक अक्षय भाऊ वायदंडे, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ( आठवले गट) शहराध्यक्ष विनय भाऊ गायकवाड, नगरपालिकेचे क्लार्क बबन जाधव, डी.पी.आय. महिला शहराध्यक्षा बानूबाई शेख तसेच इतर पदाधिकारी, सदस्य आणि मान्यवर उपस्थित होते.


अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्याने सामाजिक समता, स्वाभिमान आणि न्यायाची प्रेरणा दिली असून, त्यांचे विचार नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याचा हा उपक्रम प्रेरणादायी असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.