दुर्गदुर्गेश्वर श्री रायगड ते भूवैकुंठ श्रीक्षेत्र पंढरपूर: श्रीमन्नृप शिवछत्रपती पालखी सोहळ्याचे महाबळेश्वर नगरीत उत्साहात आगमन
महाबळेश्वर टाईम्स
महाबळेश्वर : प्रतिनिधी
दुर्गदुर्गेश्वर श्री रायगड ते भूवैकुंठ श्रीक्षेत्र पंढरपूर अशा ऐतिहासिक व भक्तिमय वातावरणात सुरू असलेल्या श्रीमन्नृप शिवछत्रपती पालखी सोहळ्याच्या परतीच्या प्रवासादरम्यान पालखीचे महाबळेश्वर नगरीत अत्यंत उत्साहपूर्ण आणि मंगलमय वातावरणात आगमन झाले.
महाबळेश्वर येथे आगमन झाल्यानंतर संदीप महेंद्र गुरुजी यांच्या समवेत शिवभक्तांनी श्रींचे दर्शन घेतले. या प्रसंगी दैने पाटील, प्रणव करमरकर, वेदांग सावर्डेकर, वेदांत वाघ, प्रवीण माळवदे यांच्यासह प्रतापगड ते श्री रायगड दरम्यान सेवेत असणारे अनेक शिवभक्त उपस्थित होते.
या भक्तिमय सोहळ्याप्रसंगी राजाभाऊ गुजर, दिनेश (बंडू) फळणे, राजेश सोंडकर, अतुल जाधव, राजेश जाधव यांच्यासह परिसरातील अनेक मान्यवर व भाविक-शिवभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. पालखीच्या आगमनाने संपूर्ण महाबळेश्वर नगरी 'जय भवानी, जय शिवाजी' आणि हरिनामाच्या गजराने दुमदुमून गेली होती.
बातम्या व जाहिराती साठी 📰 संपर्क
संपादक :- राहुल शेलार
📱 9765576377
कार्यकारी संपादक :- रियाज मुजावर
📱 9403546 485


Social Plugin