Type Here to Get Search Results !

Mahabaleshwar Times

Mahabaleshwar Times

महाबळेश्वर मध्ये पावसाचे द्विशतक पूर्ण;५१११.०९ मि मी पावसाची नोंद

 महाबळेश्वर मध्ये पावसाचे द्विशतक पूर्ण;५१११.०९ मि मी पावसाची नोंद.....!! 



महाबळेश्वर टाईम्स 

महाबळेश्वर : प्रतिनिधी 

 महाराष्ट्राचे नंदनवन आणि पावसाचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महाबळेश्वरमध्ये पावसाने यंदाच्या हंगामातील एक मोठा टप्पा पार केला आहे. गेल्या दोन दिवसांपासून महाबळेश्वर आणि पाचगणी भागात पावसाचा जोर काहीसा ओसरला असला, तरी महाबळेश्वरमध्ये या हंगामातील २०० इंचांचा टप्पा यशस्वीरीत्या पार पडला आहे.

आतापर्यंत महाबळेश्वर येथे एकूण ५१११.०९ मिलीमीटर म्हणजेच तब्बल २०१.२२४ इंच पावसाची नोंद झाली आहे.

तालुक्यात पावसाची संततधार सुरू असल्यामुळे महाबळेश्वरची जीवनवाहिनी असलेला प्रसिद्ध वेण्णा तलाव आता पूर्ण भरून वाहू लागला आहे. दाट धुके, गारठा आणि रिमझिम पावसात पर्यटक वेण्णा लेक येथे बोटिंगचा मनसोक्त आनंद लुटताना दिसत आहेत.

याशिवाय, आंबेनाळी घाटातील निसर्गरम्य धबधबे, प्रसिद्ध लिंगमळा धबधबा, केट्स पॉईंट, प्रतापगड आणि मेटतळे धबधबा यांसारख्या प्रमुख पर्यटन स्थळांवर पर्यटकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. दाट धुके आणि निसर्गाच्या या सुंदर वातावरणाने पर्यटकांना भुरळ घातली असून पर्यटक या पावसाळी वातावरणाचा परिपूर्ण आनंद घेत आहेत.


       बातम्या व जाहिराती साठी 📰 संपर्क

               संपादक :- राहुल शेलार 

                 📱 9765576377

          कार्यकारी संपादक :- रियाज मुजावर 

                 📱 9403546 485