Type Here to Get Search Results !

Mahabaleshwar Times

Mahabaleshwar Times

गणेशोत्सवापूर्वी महाबळेश्वर-पोलादपूर एसटी बस सेवा सुरू करण्याची शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाची मागणी

 गणेशोत्सवापूर्वी महाबळेश्वर-पोलादपूर एसटी बस सेवा सुरू करण्याची शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाची मागणी



महाबळेश्वर टाईम्स 

​महाबळेश्वर : प्रतिनिधी 

गणेशोत्सवाच्या सणात मुंबईहून कोकणात आणि गावी येणाऱ्या चाकरमान्यांची गैरसोय टाळण्यासाठी महाबळेश्वर-पोलादपूर एसटी बस सेवा सणापूर्वी तातडीने सुरू करावी, अशी जोरदार मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) महाबळेश्वर शहराच्या वतीने करण्यात आली आहे. यासंदर्भात पक्षाच्या शिष्टमंडळाने आगार व्यवस्थापक महेश जाधव यांना निवेदन सुपूर्द केले असून तहसीलदार सचिन मस्के यांच्याशी चर्चा करून आंबेनळी घाटातून महाड व पोलादपूरकडे जाणारी एसटी वाहतूक पूर्ववत करण्याची मागणी केली आहे.


​सध्या आंबेनळी घाटातील मार्गावरील निर्बंधांमुळे प्रवाशांना पुण्यामार्गे मोठा वळसा घालून प्रवास करावा लागत आहे. यामुळे वेळेची नासाडी तर होतेच, पण प्रवाशांना नाहक आर्थिक फटकाही सहन करावा लागतो. या परिस्थितीचा गैरफायदा घेत खाजगी वाहनचालकांकडून प्रवाशांची मोठी आर्थिक लूट सुरू आहे.

​सातारा व रायगड जिल्हा प्रशासनाने परस्पर समन्वय साधून महाबळेश्वर, पोलादपूर, महाड आणि मुंबई दरम्यान एसटी सेवा त्वरित सुरू केल्यास चाकरमान्यांचा प्रवास अधिक सुरक्षित, सुलभ आणि कमी खर्चात होईल.

 प्रशासनाने या गंभीर समस्येकडे त्वरित लक्ष देऊन दिलासा द्यावा, असा सूर सर्वसामान्य प्रवाशांमधून उमटत आहे.


​निवेदन देतेवेळी शहर प्रमुख राजाभाऊ गुजर, राजेश साळवी, युवा सेनेचे आकाश साळुंखे, अशोक शिंदे, अमोल साळुंखे, मिथिलेश कानडे, राजू परदेशी आणि पत्रकार राजेश सोंडकर यांच्यासह इतर सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

      बातम्या व जाहिराती साठी 📰 संपर्क

               संपादक :- राहुल शेलार 

                📱 9765576377

       कार्यकारी संपादक  :- रियाज मुजावर 

                📱 9403546 485