Type Here to Get Search Results !

Mahabaleshwar Times

Mahabaleshwar Times

महाबळेश्वरच्या नागरी सुविधांना नवे बळ: जेटिंग मशीन अन् टँकरचे धडाक्यात लोकार्पण

 महाबळेश्वरच्या नागरी सुविधांना नवे बळ: जेटिंग मशीन अन् टँकरचे धडाक्यात लोकार्पण



महाबळेश्वर टाईम्स 

महाबळेश्वर :  प्रतिनिधी

स्वातंत्र्यदिनाचा उत्साह आणि पर्यटनाची पंढरी मानल्या जाणाऱ्या महाबळेश्वरच्या विकासाचा ध्यास, या दोन्हींचा सुंदर संगम १५ ऑगस्ट रोजी अनुभवायला मिळाला. महाबळेश्वर गिरीस्थान नगर परिषदेने या ऐतिहासिक दिवसाचे औचित्य साधत शहराच्या स्वच्छता व आरोग्य यंत्रणेत क्रांती घडवून आणणारे हाय-प्रेशर जेटिंग मशीन आणि ५,००० लिटर क्षमतेचा अत्याधुनिक वॉटर टँकर जनतेच्या सेवेत दाखल केला आहे.


​मुख्य ध्वजारोहणाच्या सोहळ्यानंतर नेताजी सुभाषचंद्र बोस चौकातील राष्ट्रध्वजास अभिवादन करून अत्यंत उत्साही वातावरणात या दोन्ही वाहनांचे लोकार्पण करण्यात आले. जगभरातून येणाऱ्या पर्यटकांची गर्दी आणि स्थानिकांच्या गरजा लक्षात घेता, प्रशासनाने उचललेले हे पाऊल महाबळेश्वरच्या पायाभूत सुविधांमध्ये मैलाचा दगड ठरणार आहे.


तुंबलेल्या ड्रेनेजपासून सुटका, पाणीटंचाईवर मात

पावसाळ्यात किंवा पर्यटन हंगामात सांडपाण्याची वाहिनी तुंबल्यास त्याचा थेट फटका शहराच्या स्वच्छतेला बसतो. यावर मात करण्यासाठी आणलेले हाय-प्रेशर जेटिंग मशीन उच्च दाबाच्या पाण्याच्या फवाऱ्याने भुयारी गटारे क्षणार्धात साफ करेल. दुसरीकडे, उन्हाळा अथवा आपत्कालीन स्थितीत पिण्याच्या पाण्याचा तुटवडा भासू नये यासाठी तब्बल पाच हजार लिटर क्षमतेचा नवीन टँकर सज्ज झाला असून, यामुळे दूरवरच्या भागातही सुरळीत पाणीपुरवठा करणे शक्य होणार आहे.

शहराचे सौंदर्य आणि आरोग्य जपण्यासोबतच नागरिकांच्या तक्रारींचे जलद निवारण करण्यासाठी आमची नगर परिषद कटिबद्ध आहे. ही नवीन वाहने तांत्रिक अडचणींवर तातडीने मात करण्यास मदत करतील असा विश्वास नगराध्यक्ष सुनील शिंदे यांनी व्यक्त केला.


या सोहळ्याला नगराध्यक्ष सुनील शिंदे, उपनगराध्यक्ष नासिर मुलाणी, मुख्याधिकारी योगेश पाटील, तसेच नगरसेवक संजय जंगम, अफझल सुतार, रोहित ढेबे, संतोष शिंदे, राहुल पिसाळ, रविंद्र कुंभारदरे, कुमार शिंदे, राजू नालबंद, किसन शिंदे, मिलिंद ढेबे आणि नगरसेविका विमलताई पार्टे, संगीता वाडकर, विद्या बावळेकर, रेश्मा ढेबे, स्मिता पाटील त्यांच्यासह नगरपालिकेचे सर्व कर्मचारी, स्थानिक नागरिक आणि गिरीस्थान प्रशालेच्या विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


सोहळ्याची शोभा वाढवली. महाबळेश्वरला अधिक स्वच्छ, सुंदर आणि समृद्ध बनवण्याचा संकल्प या प्रसंगी उपस्थितांनी व्यक्त केला.


      बातम्या व जाहिराती साठी 📰 संपर्क

                संपादक :- राहुल शेलार 

                   📱 9765576377

       कार्यकारी संपादक :- रियाज मुजावर 

                   📱 9403546 485