श्रावणी सोमवारनिमित्त श्री क्षेत्र महाबळेश्वर येथे भाविकांची गर्दी; प्रसादाचे वाटप
महाबळेश्वर टाईम्स
महाबळेश्वर : प्रतिनिधी
पवित्र श्रावण महिन्यातील पहिल्या सोमवारी श्री क्षेत्र महाबळेश्वर येथे भाविक आणि पर्यटकांची दर्शनासाठी मोठी गर्दी पाहायला मिळाली. पहाटेपासूनच भाविकांनी श्री क्षेत्र महाबळेश्वर येथील ऐतिहासिक पंचगंगा मंदिरामध्ये पवित्र स्नान करून श्री महाबळेश्वर मंदिरात जाऊन महादेवाचे दर्शन घेतले. पहिल्या श्रावणी सोमवारी भाविकांच्या उत्साहाने संपूर्ण परिसर भक्तिमय झाला होता.
या विशेष प्रसंगी येणाऱ्या हजारो भाविकांची सोय व्हावी यासाठी महाबळेश्वर देवस्थान ट्रस्ट, स्थानिक ग्रामपंचायत आणि ग्रामस्थांच्या विशेष सहकार्यातून विविध उपक्रम राबवण्यात आले. पुण्यातील शैलेश मुळे व सुनील ओसवाल तसेच हॉटेल लेक व्ह्यू चे जयंतीलाल जव्हेरी यांच्या वतीने दर्शनासाठी आलेल्या सर्व भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. स्थानिक प्रशासनाच्या आणि दात्यांच्या संयुक्त नियोजनामुळे हजारो भाविकांना सुखकर दर्शन घेता आले.
बातम्या व जाहिराती साठी 📰 संपर्क
संपादक :- राहुल शेलार
📱 9765576377
कार्यकारी संपादक :- रियाज मुजावर
📱 9403546 485



Social Plugin